शिर्डी मतदारसंघावर विखे पाटलांची चलती, तरीही लसीकरणात राजकीय हस्तक्षेप

आश्वी गटातील विकास कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, की केंद्र सरकारच्या माध्यमातुन दररोज सत्तर लाख लसीकरण करण्यात येत आहे.
sujay vikhe.jpg
sujay vikhe.jpg

आश्वी : शिर्डी विधानसभा मतदार संघात सुरु असलेल्या कोविड लसीकरणात राजकिय लोकांच्या हस्तक्षेपामुळे व्यत्यय येत आहे. या पार्श्वभुमिवर मतदार संघातील संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द व निमगावजाळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरणासाठी टोकनची व्यवस्था सुरु करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. (Vikhe Patil's move on Shirdi constituency, still political interference in vaccination)

आश्वी गटातील विकास कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, की केंद्र सरकारच्या माध्यमातुन दररोज सत्तर लाख लसीकरण करण्यात येत आहे. आश्वी गटातील लसीकरणात राजकीय लोकांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे अनेक लाभार्थ्यांना वंचित रहावे लागत असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. लसीकरणासाठी रात्री अथवा पहाटे रांगा लावण्याची आवश्यकता या पुढे राहणार नाही. त्यासाठी नवीन व्यवस्था करण्यात येणार आहे. उपलब्ध डोसपैकी निम्मे डोस दुसऱ्या लसीच्या लाभार्थ्यांसाठी तर उर्वरित अती जोखमीच्या लाभार्थ्यांना देण्यात यावेत. दुसऱ्या डोसची नावे आशा व अंगणवाडी सेविका तसेच ग्रामसेवकामार्फत यादी करुन लाभार्थ्यांना लसीकरणापूर्वी एक दिवस आगोदर टोकन दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा..

गैरप्रकार होत असल्यास त्या ठिकाणचे लसीकरण बंद करण्यात येणार आहे. अधिकाऱ्य़ांनी या बाबत लोकसंख्येप्रमाणे झालेल्या कार्यवाही व टक्केवारीची यादी पुढील बैठकीत सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले. लसीकरणाची टक्केवारी कमी असलेल्या गावांमधील लसीकरण ऑगस्ट अखेर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या. या वेळी प्रवरा बँकेचे चेअरमन अशोकराव म्हसे, बाळासाहेब भवर, अँड.अनिल भोसले, रामभाऊ भुसाळ, जिल्हा परिषद सदस्य रोहिणी निघुते, कांचन मांढरे उपस्थित होते.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com