थोरातांच्या मतदारसंघात विखे पाटलांचा आरोप, राज्याच्याच निष्क्रियतेमुळे हे घडले - Vikhe Patil's allegation in Thorat constituency is that this happened due to the inaction of the state itself | Politics Marathi News - Sarkarnama

थोरातांच्या मतदारसंघात विखे पाटलांचा आरोप, राज्याच्याच निष्क्रियतेमुळे हे घडले

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 3 जून 2021

मराठा आरक्षणासंदर्भात मागील भाजप युती सरकारने सकारात्‍मक भूमिका घेऊन उच्‍च आणि सर्वोच्‍च न्‍यायालयांत आरक्षण टिकण्यासाठी यशस्‍वी प्रयत्‍न केले.

संगमनेर : ‘‘मराठा(Maratha) आरक्षणासंदर्भात मागील भाजप युती सरकारने सकारात्‍मक भूमिका घेऊन उच्‍च आणि सर्वोच्‍च न्‍यायालयांत आरक्षण टिकण्यासाठी यशस्‍वी प्रयत्‍न केले. मात्र, आघाडी सरकारच्‍या काळातच हे आरक्षण न्‍यायालयाने रद्द केले. यासाठी राज्‍य सरकारची निष्क्रियता कारणीभूत ठरली. या प्रश्‍नाकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही,’’ असा आरोप आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe) यांनी केला. (Vikhe Patil's allegation in Thorat constituency is that this happened due to the inaction of the state itself)

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा मतदारसंघ असलेल्या संगमनेरमध्ये काल सकल मराठा समाजातील संघटनांच्‍या प्रतिनिधींसमवेत आरक्षणाच्‍या मुद्द्यावर झालेल्या बैठकीत ते बोलत होते. 

विखे पाटील म्हणाले, की  ‘‘आरक्षणाच्‍या बाबतीत केंद्र सरकारवर दोषारोप करणारे महाविकास आघाडीचे नेते आपल्‍या भूमिकेपासून पळ काढीत आहेत. मराठा समाजाचे आरक्षण न्‍यायालयात रद्द होण्‍यास सरकारचा निष्क्रिय कारभारच कारणीभूत ठरला असून, समाजाच्‍या न्‍याय्य हक्कांसाठी येणाऱ्या काळात मराठा समाजाच्या प्रत्येक लढाईत भाजप म्‍हणून आमचा सक्रिय सहभाग असेल.’’

ते म्हणाले, ‘‘आरक्षणाचा प्रश्‍न राजकीय नाही, तर तो मराठा समाजाचा स्‍वाभिमान आणि अस्‍मितेचा आहे. त्‍यामुळेच राजकारणाच्‍या पलीकडे जाऊन पुढची लढाई करावी लागेल. यासाठी समाजाच्‍या माध्‍यमातून आंदोलनासंदर्भात होणाऱ्या निर्णयांबरोबर भाजपचे सर्व कार्यकर्ते सक्रिय सहभागी असतील.’’ 

अमोल खताळ म्हणाले, ‘‘मराठा समाजातील युवकांचे भवितव्‍य या निर्णयावर अवलंबून असल्याने, आरक्षणाचा न्‍याय आणि हक्‍काच्‍या मागणीसाठी लढाई करण्‍याची आमची तयारी आहे. त्‍यामुळे समाजातील भावनांशी फार न खेळता आरक्षणाचा निर्णय व्‍हावा, ही आमची अपेक्षा कोणीही पूर्ण करावी.’’ 

भाजपचे जिल्‍हाध्‍यक्ष राजेंद्र गोंदकर, जिल्‍हा संघटक नितीन दिनकर, जिल्‍हा सरचिटणीस सुनील वाणी, भाजयुमोचे जिल्‍हाध्‍यक्ष अॅड. श्रीराज डेरे, जालिंदर वाकचौरे, अॅड. बापूसाहेब गुळवे, तालुकाध्‍यक्ष डॉ. अशोक इथापे, डॉ. सोमनाथ कानवडे, नगरसेविका मेधा भगत, कार्यकर्ते अमोल खताळ, नीलिमा घाटगे, अक्षय थोरात, सुधाकर गुंजाळ, शिरीष मुळे, सतीश कानवडे, काशिनाथ पावसे, योगीराजसिंग परदेशी, वैभव लांडगे, राजेंद्र सांगळे, राजेंद्र देशमुख, रोहित चौधरी, नानासाहेब दिघे, मनजित गायकवाड, किशोर नावंदर, दिनेश सोमाणी, सीताराम मोहरीकर उपस्थित होते. 

 

हेही वाचा..

ठरलं एकदाचं, विखे पाटलांच्या नेतृत्त्वाखाली एकत्र यायचं

 

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख