बंगाल हिंसाचारप्रकरणी आज विखे, कोल्हे, पिचड रस्त्यावर येणार - Vikhe, Kolhe, Pitchad will be on the streets today in the Bengal violence case | Politics Marathi News - Sarkarnama

बंगाल हिंसाचारप्रकरणी आज विखे, कोल्हे, पिचड रस्त्यावर येणार

सतीश वैजापूरकर
बुधवार, 5 मे 2021

पश्‍चिम बंगालमध्ये सूडाचे राजकारण सुरू झाले आहे. ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांवर तृणमूल कॉंग्रेसचे गुंड हल्ले करीत आहेत.

शिर्डी : पश्‍चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांचे खून केले आहेत. या हिंसाचाराच्या निषेधार्थ भाजपचे कार्यकर्ते आज (बुधवारी) उत्तर नगर जिल्ह्यात निदर्शने करणार आहेत, अशी माहिती पक्षाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी दिली. 

ते म्हणाले, ""पश्‍चिम बंगालमध्ये सूडाचे राजकारण सुरू झाले आहे. ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांवर तृणमूल कॉंग्रेसचे गुंड हल्ले करीत आहेत. भाजप कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणांना आगी लावणे, असे प्रकार घडत आहेत. या हिंसाचाराच्या निषेधार्थ भाजपचे कार्यकर्ते शांततामय मार्गाने निदर्शने करतील. कोरोनाचे नियम पाळून आंदोलन होईल. 

माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे, भाजपच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी आमदार वैभव पिचड, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या उपस्थितीत आंदोलन होईल. 

 

हेही वाचा...

कांदा काढण्यास मिळेनात मजूर 

कर्जत : अनेक अडचणींवर मात करून उत्पादन घेतले; मात्र आता कोरोना संसर्गाचा शेतमालाला फटका बसत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कांदा काढण्यासाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. मजुरांअभावी भाजीपाला, फळे, कांदा शेतातच पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होत असून, तो हतबल झाला आहे. 

तालुक्‍यातील काही भागातील शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू, हरभरा, तूर, बाजरी या पारंपरिक शेतीला छेद देत बटाटा, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, शेवगा, पालक, लसूण, मेथी यांसारख्या पिकांकडे मोर्चा वळविला. मात्र, सध्या कोरोना संसर्गामुळे बाजार समित्या, शहरासह गावातील आठवडे बाजार, तसेच खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. 

बी-बियाणे, खते, तसेच मजुरी वाढल्याने, घेतलेले पीक आणि त्यातून मिळणारे उत्पन्न यांच्यात मोठी तफावत येते. शेतकरी यामुळे मेटाकुटीला आले आहेत. सध्या कोरोनामुळे बटाटा, टोमॅटो, कांद्यासह मेथी, पालक, कोथिंबिरीसारख्या पालेभाज्या काढायला आल्या आहेत. दोन दिवसांत ही पिके न काढल्यास शेतात नासतील.

"कुकडी'चे आवर्तन लांबल्याने शेतकऱ्यांनी पदरमोड करून, प्रसंगी विकतचे पाणी घेत भाजीपाला जागविला आहे. मात्र, शेतात पडून असलेला हा भाजीपाला वाहतुकीसाठी परवानगी असली तरी काढायचा कधी व विकायचा कुठे, हा मोठा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 
 

Edited By - Murlidhar Karle

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख