एक जूननंतर अनलॉक प्रक्रिया अपेक्षित : मंत्री प्राजक्त तनपुरे - Unlock process expected after June 1: Minister Prajakta Tanpure | Politics Marathi News - Sarkarnama

एक जूननंतर अनलॉक प्रक्रिया अपेक्षित : मंत्री प्राजक्त तनपुरे

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 29 मे 2021

कोरोनाची दुसरी लाट हळूहळू कमी होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व जिल्ह्यांचा आढावा घेणार आहेत. एक जूननंतर अनलॉक प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित आहे.

राहुरी : जिल्ह्यात चौदाव्या वित्त आयोगाच्या व्याजातून 45 रुग्णवाहिका खरेदी केल्या. त्यापैकी पाच रुग्णवाहिका राहुरी तालुक्‍यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी मिळाल्या आहेत. कोरोनाची दुसरी लाट हळूहळू कमी होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व जिल्ह्यांचा आढावा घेणार आहेत. एक जूननंतर अनलॉक प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित आहे. असे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी सांगितले. (Unlock process expected after June 1: Minister Prajakta Tanpure)

राहुरी येथे पंचायत समितीच्या आवारात पाच रुग्णवाहिकांच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी पंचायत समितीच्या सभापती बेबी सोडनर, उपसभापती प्रदीप पवार, सदस्य रवींद्र आढाव, मनीषा ओहोळ,बाळासाहेब लटके, सुरेश निमसे, भाऊसाहेब लोंढे, नीलेश राऊत, संतोष आघाव, मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे,सहायक गटविकास अधिकारी अनंत परदेशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दीपाली गायकवाड उपस्थित होते. 

तालुक्‍यातील देवळाली प्रवरा, उंबरे, मांजरी, टाकळीमिया, गुहा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका देण्यात आल्या. त्यामुळे, ग्रामीण भागातील कोरोना व इतर आजारांनी पीडित गोरगरीब रुग्णांना तत्काळ दवाखान्यात हलविण्यासाठी मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध झाली आहे. 

 

हेही वाचा..

वांबोरी चारीचा प्रश्न पुढील आठवड्यात मार्गी लावणार

तिसगाव : गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेला वांबोरी चारी टप्पा-दोनचा प्रश्न पुढील आठवड्यात जलसंपदामंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत मार्गी लावू, अशी ग्वाही राज्यमंत्री तनपुरे यांनी दिली. 

माजी सभापती संभाजी पालवे यांच्या शिष्टमंडळाने राजेंद्र पाठक, विलास टेमकर, अशोक टेमकर, तुळशीदास शिंदे आदींसह आज राज्यमंत्री तनपुरे यांची भेट घेऊन चर्चा करीत निवेदन दिले. 

या वेळी तनपुरे म्हणाले, ""वांबोरी चारीला यापूर्वीच प्रशासकीय मंजुरी मिळाली होती; मात्र त्यामध्ये बदल करत टप्पा-दोनसाठी मुळा धरणातून स्वतंत्र पाइपलाइन टाकण्याचे नियोजन केले. त्यामुळे नव्याने एस्टिमेट केले आहे. त्याची पूर्तता आता पूर्ण झाली आहे. आता फाइल प्रशासकीय मंजुरीसाठी आली आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. तीत वांबोरी चारी टप्पा-दोनला मंजुरी देऊन तातडीने निधी मंजूर केला जाणार आहे.'' 

... तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल

वांबोरी चारी टप्पा-दोन हा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा जीवनमरणाचा प्रश्न आहे. तो मार्गी लागल्यास या भागातील पिण्याच्या पाण्याचा, शेतीचा, तसेच रोजगाराचाही प्रश्न मार्गी लागणार आहे. आम्ही राजकारणविरहित हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी नेहमी प्रयत्न करीत आहेत. 
- संभाजी पालवे, माजी सभापती, पाथर्डी 
 

हेही वाचा..

फुकट मिळेना, तर विकत लस घ्या

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख