शालिनी विखेंच्या नेतृत्वाखाली महिलांचे समुपदेशन उपक्रम सामान्यांना ठरतोय आधार

जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून समुपदेशन व्यवस्था निर्माण केली आहे. त्याद्वारे 113 कुटुंबांतील वाद-विवाद मिटविण्यात यश आले आहे.
Shalini vikhe.jpg
Shalini vikhe.jpg

शिर्डी : "कोविड प्रकोपामुळे होणारे मृत्यू, उत्पन्नाचे बंद झालेले मार्ग आणि उपचारावर होणारा मोठा खर्च, यामुळे जागतिक पातळीवर कुटुंबव्यवस्थेवर मोठे आघात होत आहेत. कौटुंबिक ताणतणाव व त्यातून निर्माण झालेल्या समस्यांतून मार्ग काढण्यासाठी आम्ही राहाता तालुक्‍यात जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून समुपदेशन व्यवस्था निर्माण केली आहे. त्याद्वारे 113 कुटुंबांतील वाद-विवाद मिटविण्यात यश आले आहे,'' अशी माहिती जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील (Shalini Vikhe) यांनी दिली. (Under the leadership of Shalini Vikhen, women's counseling activities are becoming a common ground)

"कोविड प्रकोपातील समस्या आणि राहाता तालुक्‍यातील महिला बचत चळवळ' या विषयावर मतप्रदर्शन करताना त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ""राहाता तालुक्‍यात आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेऊन कोविड उपचार व्यवस्थेसाठी सुरवातीपासून पुढाकार घेतला आहे. प्रवरा कोविड सेंटर, विळद घाट व पीएमटी कोविड रुग्णालये सुरू केली. कोविड प्रकोपामुळे जगात सर्वत्र कौटुंबिक ताणतणाव वाढत आहेत. त्याचे प्रतिबिंब राहाता तालुक्‍यातदेखील पाहायला मिळते. कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढल्या. वाद घटस्फोटापर्यंत विकोपाला जातात. या बाबी जगभरातील प्रसारमाध्यमांतून फारशा चर्चिल्या जात नाहीत. कोविडचा भर ओसरल्यानंतर मानसोपचारतज्ज्ञांना जगभरात महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल. सध्याच्या काळात आम्ही जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून समुपदेशन व्यवस्था उभी केली. वेळप्रसंगी कायद्याचा आधार घ्यावा लागला, तर वकिलांची नियुक्ती केली आहे.'' 

""कोविड संकटात तालुक्‍यातील बचतगटांतील महिलांनी तब्बल तीन लाख रुपये किमतीचे मास्क विकून कुटुंबाला आर्थिक आधार देण्याचे काम केले. महिला बचतगटांची बरीच उत्पादने तयार होती. "लॉकडाउन'मुळे विक्रीची समस्या निर्माण झाली. आम्ही त्यासाठी घरगुती उत्पादनांची विक्री करू शकणाऱ्या काही संस्थांशी संपर्क साधला. वेबिनार आयोजित करून बचतगटांतील महिलांना त्याबाबत मार्गदर्शन केले. त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळाले. राहाता पंचायत समिती व जनसेवा फाउंडेशनच्या सहकार्याने मार्केटिंग या विषयावर ऑनलाइन चर्चासत्रांचे आयोजन केले,'' असे त्यांनी सांगितले. 

त्या म्हणाल्या, ""कोविड खबरदारी, लक्षणे व उपाय, लसीकरणाचे महत्त्व, कोविडची संभाव्य तिसरी लाट आली तर घरातील लहान मुलांची पालकांनी कशी काळजी घ्यावी, अशा विविध विषयांवर राहाता पंचायत समितीच्या माध्यमातून जनजागरण मोहिमांचे आयोजन केले जात आहे. तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या मार्गदर्शनाच्या चित्रफिती सोशल मीडियाद्वारे महिला बचतगटांना सातत्याने पाठविल्या जात आहेत.'' 

दरम्यान, अशा पद्धतीचा उपक्रम महाराष्ट्रात इतरत्र पाहण्यास मिळत नाही.

महिलांचे अनेक प्रश्न

बऱ्याच श्रमजीवी महिला रोज माझ्याकडे येतात. "थोडी पुंजी सांभाळून ठेवलीय; व्यसनी नवरा ती उधळून टाकील म्हणून तुमच्या पतसंस्थेत ठेवा. लेकराबाळांना तेवढाच आधार आहे,' असे म्हणतात. या संकटातही या महिला स्वस्थ बसलेल्या नाहीत. कुटुंबासाठी कष्ट करून दोन पैसे मिळवीत आहेत. दुसरीकडे, काही संपन्न व उच्चशिक्षित कुटुंबांत कौटुंबिक हिंसाचाराच्या आणि वादविवादाच्या घटना वाढत आहेत. या जागतिक महामारीला असे अनेक कंगोरे असल्याचे पाहायला मिळत आहेत. 
- शालिनी विखे पाटील, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद 

हेही वाचा...

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com