प्रश्‍नांना उत्तरे देण्यास असमर्थ असल्यानेच अधिवेशन दोन दिवसांत गुंडळणार

विरोधी पक्षाच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास हे सरकार असमर्थ असल्यानेच हे अधिवेशन दोन दिवसांत गुंडाळण्यात येत आहे.
Arun Munde bjp.jpg
Arun Munde bjp.jpg

नगर : महाराष्ट्र विधी मंडळाचे दोन दिवसाचे अधिवेशन सुरु झाले आहे, परंतु अधिवेशन म्हणजे लोकशाहीची क्रुर थट्टा ठरणार आहे. कारण राज्यासमोरील कोणत्याही महत्वाच्या प्रश्‍नांवर चर्चा या अधिवेशनात होणार नाही. विरोधी पक्षाच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास हे सरकार असमर्थ असल्यानेच हे अधिवेशन दोन दिवसांत गुंडाळण्यात येत असल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी केला.

जिल्हा भाजपाच्यावतीने मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयजवळ निदर्शने करुन निवेदन देण्यात आले. या वेळी राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, दिलीप भालसिंग, शामराव पिंपळे, अ‍ॅड.विवेक नाईक, अशोक खेडकर, नरेश शेळके, दादा बोठे, महेश तवले, संतोष रायकर, अर्चना चौधरी, अनिल लांडगे, धनंजय बडे आदी उपस्थित होते.

मुंडे म्हणाले,की विधिमंडळ सदस्यांचे घटनेने दिलेले अधिकार, प्रश्‍न विचारणे, स्थगन प्रस्ताव, लक्षवेधी आदी व्यापगत केले आहेत. राज्यामध्ये आघाडी सरकारचे एक-एक मंत्री भ्रष्टाचारामध्ये अडकत चालले असून, सरकार चालविण्यास हे आघाडी सरकार अपयशी ठरल्याने त्यांनी आता पायउतार व्हावे व राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करत आहोत. जनतेच्या प्रश्‍नांना उत्तर द्यायला हे सरकार घाबरत आहे.

सत्तेतील महाआघाडी सरकार जनतेच्या प्रश्‍नांना उत्तर द्यायला घाबरत आहे, असा आरोप करून मुंडे म्हणाले, की मधल्या काळात भ्रष्ट्रचार व महिलांवरील अत्याचारामुळे दोन मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत. आणखी काही मंत्र्यांवर भ्रष्टाचारांचे आरोप आहेत. त्याचप्रमाणे कोरोनाशी मुकाबला करण्यात हे सरकार सपशेल अपयशी ठरले असून, कोणत्याही स्वरुपाची कोरोना रुग्णांना मदत केलेली नाही. लॉकडाऊनमुळे अडचणीत असणार्‍या जनतेला आर्थिक पॅकेज दिलेले नाही. शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे देशात राज्यात सगळ्यात जास्त कोरोना रुग्ण आहेत व मृत्यूही जास्तच झाले आहेत. यासर्व विषयावर विरोधी पक्ष प्रश्‍नांचा भडीमार करील व सरकारचा नाकर्तेपणा जनतेसमोर उघडा पडेल, अशा भितीपोटी अधिवेशन फक्त दोन दिवसांचे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे हा कालावधी वाढविण्यात येऊन जनतेचे प्रश्‍न सोडवावे, अशी मागणी आम्ही करत आहोत.

या वेळी प्रा. भानुदास बेरड म्हणाले, की या सरकारने वाझेसारखे अनेक वाझे प्रत्येक जिल्ह्यात निर्माण केले आहे. तसेच आषाढी वारी संदर्भात वारकर्‍यांच्या भावनांशी खेळत आहे. कोरोनावर नियंत्रण नाही, लॉकडाऊनमुळे रोजगार गेले आहेत, आर्थिक मदत जनतेला मिळत नाही, त्यामुळे सरकार बरखास्तीशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, निवेदनाच्या प्रती राष्ट्रपती व राज्यपालांना पाठविण्यात आल्या आहेत.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com