ऑक्सिजनचे दोन टँकर नगरमध्ये दाखल - Two tankers of Oxygen Express arrived in the city | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

ऑक्सिजनचे दोन टँकर नगरमध्ये दाखल

मुरलीधर कराळे
शनिवार, 24 एप्रिल 2021

या गाडीत सात टँकर होते. त्यातील तीन नागपूरला उतरवून तेथून ग्रीन कॉरिडॉरने ठिकठिकाणी पाठवण्यात आले. त्याच पद्धतीने चार टँकरपैकी दोन नाशिकला, तर दोन नगरला पाठविले आहे. 

नगर : ऑक्सिजनचे दोन टॅंकर नगरमध्ये दाखल झाले आहेत. शहरातील शासकीय रुग्णालयात दाखल झाला. महाराष्ट्रातील ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी १९ एप्रिलला कळंबोलाहून विशाखापट्टणम येथे पाठविलेली ऑक्सिजन एक्स्प्रेस आज नाशिकला पोहोचली.

या गाडीत सात टँकर होते. त्यातील तीन नागपूरला उतरवून तेथून ग्रीन कॉरिडॉरने ठिकठिकाणी पाठवण्यात आले. त्याच पद्धतीने चार टँकरपैकी दोन नाशिकला, तर दोन नगरला पाठविले आहे. 

या टँकरमध्ये ऑक्सिजन भरल्यानंतर ही एक्स्प्रेस गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास विशाखापट्टणमहून महाराष्ट्रासाठी रवाना झाली. आज 7.30 च्या दरम्यान एक टँकर नगर च्या शासकीय रुग्णालयात पोहोचला आणि शासकीय रुग्णालय येथील टाकीत तो रिकामी करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या ऑक्सिजनमुळे काही प्रमाणात का होईना  रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

 

उपचार घेणाऱ्यांची संख्या 23 हजार पार 

जिल्ह्यात कोरोनाचे तीन हजार 780 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये नगर शहरात तब्बल 970 रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या एक लाख 56 हजार 16 झाली आहे. उपचार सुरू असणाऱ्यांनी 23 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. 

जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेतील तपासणीत 999, खासगी रुग्णालयांच्या प्रयोगशाळेतील तपासणीत 1101, रॅपिड अँटीजेन चाचणीत 1680 रुग्ण आढळून आले आहेत. नगर शहरातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्याखालोखाल नगर तालुका रुग्ण संख्येत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. तालुक्‍यात 376 रुग्ण आढळून आले आहेत. नगर तालुक्‍यातील गावांचा नगर शहराशी दळण-वळणाचा संबंध असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. 

राहाता तालुक्‍यातील प्रादुर्भाव कायम असून 307 रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुका हा कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच संवेदनशील राहिलेला आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक बाधितांमध्ये संगमनेर तालुक्‍याचा वरचा क्रमांक लागत आहे. संगमनेर तालुक्‍यात 297 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. 
कोरोना रुग्णांची उपचार सुरू असणाऱ्यांची संख्या 23 हजार 302 झाली आहे. आतापर्यंत एक हजार 776 जण मयत झालेले आहेत. दिवसभरात तीन हजार 225 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. बरे झाल्यांची रुग्णांची संख्या एक लाख 30 हजार 938 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.93 टक्के झाले आहे. 

तालुकानिहाय रुग्ण बाधित ः 

नगर ग्रामीण 376, राहाता 307, संगमनेर 297, नेवासा 246, पारनेर 185, राहुरी 183, श्रीरामपूर 158, श्रीगोंदा 155, कोपरगाव 151, शेवगाव 139, जामखेड 138, कर्जत 137, अकोले 115, पाथर्डी 108, भिंगार छावणी परिषदेच्या हद्दीत 79, लष्करी रुग्णालय 8, बाहेरील जिल्ह्यातील 27, बाहेरील राज्यातील एक रुग्ण. 
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख