नगर जिल्ह्यात ओलांडला दोन लाख कोरोना रुग्णांचा टप्पा - Two lakh corona patients crossed the Nagar district | Politics Marathi News - Sarkarnama

नगर जिल्ह्यात ओलांडला दोन लाख कोरोना रुग्णांचा टप्पा

मुरलीधर कराळे
मंगळवार, 11 मे 2021

नगर जिल्ह्यात आतापर्य़ंत कोरोना रुग्णांचा दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत दोन लाख 13 हजार 347 रुग्णांची नोंद झाली आहे.

नगर : जिल्ह्यात आतापर्य़ंत कोरोना (Corona) रुग्णांचा दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत दोन लाख 13 हजार 347 रुग्णांची नोंद झाली आहे. (Two lakh corona patients crossed the Nagar district)

सध्या कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या एक लाख 83 हजार 171 असून, 27 हजार 865 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन हजार 338 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. काल दोन हजार 86 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून, नव्याने चार हजार 59 बाधितांची भर पडली आहे.

जिल्ह्यात आज  २ हजार ८६ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या एक लाख ८३ हजार १७१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.८५ टक्के इतके झाले आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २०८१, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १ हजार ३५६ आणि अँटीजेन चाचणीत ६२२ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ८४, अकोले १८३, जामखेड ९५, कर्जत ६०, कोपरगाव १८, नगर ग्रामीण २०१, नेवासा १८९, पारनेर १०६, पाथर्डी १९०, राहता १७६, राहुरी १०१, संगमनेर १९०, शेवगाव २८१, श्रीगोंदा ६९, श्रीरामपूर ९२, कॅंटोन्मेंट बोर्ड १४, मिलिटरी हॉस्पिटल ११ आणि इतर जिल्हा २१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १८४, अकोले ६०, जामखेड ०३, कर्जत १८, कोपरगाव ६८, नगर ग्रामीण १५२, नेवासा ५३,  पारनेर ५९, पाथर्डी ३२, राहाता १२२,  राहुरी ३७, संगमनेर ३९३, शेवगाव १५, श्रीगोंदा २५, श्रीरामपूर ८७, कॅंटोन्मेंट बोर्ड ०७ आणि इतर जिल्हा ४१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ६२२ जण बाधित आढळुन आले. मनपा १६, अकोले १७,  जामखेड १३, कर्जत ७९, कोपरगाव ६८, नगर ग्रामीण २४, नेवासा ६९, पारनेर ५५,  पाथर्डी ५०,  राहाता १९, राहुरी ५८, संगमनेर ११, शेवगाव १० श्रीगोंदा १०३, श्रीरामपूर २६, कॅंटोन्मेंट ०१ आणि इतर जिल्हा ३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचा..

पुणेकरांनी पळविला नगरचा आॅक्सिजन

दरम्यान, काल डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ४११, अकोले २६६, जामखेड १४, कर्जत १०१,  कोपरगाव ७८, नगर ग्रामीण १९३, नेवासा ७२, पारनेर १३३, पाथर्डी ९२, राहाता ११८, राहुरी १११, संगमनेर १०३,  शेवगाव १२७,  श्रीगोंदा ८४,  श्रीरामपूर ११६, कॅन्टोन्मेंट ३२, मिलिटरी हॉस्पिटल ०१,  इतर जिल्हा ३१ आणि इतर राज्य ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

 

 

 

 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख