माझ्या 20 हजार लोकसंख्येच्या गावात एकही डॉक्‍टर नाही ः सोनिया दुहानने सांगितले भीषण वास्तव

हरियाणातील माझ्या सुमारे वीस ते बावीस हजार लोकसंख्येच्या गावात साध्या प्राथमिक आरोग्याच्या सुविधा देखील नाहीत. गावात डॉक्‍टर नाहीत.
Soniya Duhan.jpg
Soniya Duhan.jpg

पारनेर : हरियाणातील (Hariyana) माझ्या सुमारे वीस ते बावीस हजार लोकसंख्येच्या गावात साध्या प्राथमिक आरोग्याच्या सुविधा देखील नाहीत. गावात डॉक्‍टर नाहीत. तेथे कोरोना संसर्गाच्या तपासण्या सुद्धा केल्या जात नाहीत, असे भीषण वास्तव राष्ट्रवादी विद्यार्थी युवती कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहान (Soniya Duhan) यांनी सांगितले. (There is no doctor in my village of 20,000 population: Sonia Duhan told the grim reality)

आमदार लंके यांच्या मार्गदर्शनाखाली भाळवणी येथे सुरू असलेल्या शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिरास दुहान यांनी भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्यांच्या समावेत आमदार लंके यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी सनी मानकर, पश्‍चिम महाराष्ट्र प्रमुख सुहास कदम, कोकण विभाग प्रमुख किरण शिखरे, पुणे विभागाच्या अध्यक्ष संध्या सोनवणे, मराठवाडा अध्यक्ष प्रशांत कदम, कृषी विभाग प्रमुख विनोद भांगे, प्रदेश संघटक कुंदन काळे, जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर, कार्याध्यक्ष विशाल म्हस्के, युवती जिल्हाध्यक्ष राजेश्‍वरी कोठावळे, नीलेश लंके प्रतिष्ठान युवकचे अध्यक्ष विजय औटी आदी उपस्थित होते. 

दुहान म्हणाल्या, की कोरोना महामारीमुळे समाज अडचणीत आहे. अशा वेळी आमदार नीलेश लंके यांनी कोविड सेंटरच्या माध्यमातून सुरू केलेले काम राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सामाजिक धोरणानुसार आहे. राजकारण हे फक्त निवडणुकांच्या वेळी करावयाचे असते. इतर वेळ समाजकारण करावे. पक्षाचे अध्यक्ष पवार यांची शिकवणच ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण, अशी आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लंके यांनी कोविड सेंटर सुरू करून केवळ समाजिक काम केले आहे. आम्ही थेट हरियाणामधून लंके यांच्या कामाची माहिती घेऊन कोविड सेंटर पाहण्यासाठी आलो आहोत. 

हेही वाचा..

ग्रामविकासात सरपंच परिषदेचे मोठे योगदान

नगर : महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासामध्ये भर घालण्यात सरपंच परिषदेचा मोठा वाटा आहे भविष्यामध्ये हे काम जोमाने वाढवा राज्य व देशामध्ये सरपंच व शेतकरी जोपर्यंत संघटित होत नाही तोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही आता सरपंचांनी संघटित व्हावे सरपंच परिषदेची ताकत वाढवावी सरपंच परिषदेच्या सक्रीय सभासदत्व घ्यावे असे आवाहन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.

हिवरे बाजार (ता.नगर) येथे सरपंच परिषद या राज्यभर सरपंचांच्या हक्क अधिकार न्याय-अन्यायावर अविरतपणे काम करणाऱ्या 

संघटनेचे सदस्य नोंदणी मोबाईल ॲपचे लोकार्पण पद्मश्री पवार यांच्या हस्ते मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले त्यावेळी पवार बोलत होते.

हेही वाचा...

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com