ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती ! गडाखांनी केला गौप्यस्फोट

मागील पाच वर्षात भारतीय जनता पक्षाचाशिवसेनेला कटू अनुभव आल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला.
Uddhav Thackrey.jpg
Uddhav Thackrey.jpg

श्रीरामपूर : शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची आजिबात इच्छा नव्हती. मात्र मागील पाच वर्षात भारतीय जनता पक्षाचा शिवसेनेला कटू अनुभव आल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला. आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करुन मुख्यमंत्री झाल्याचा गौप्यस्फोट मृदा व जससंधारण राज्यमंत्री शंकरराव गडाख यांनी केला आहे. (Thackeray did not want to be Chief Minister! Gadakh blasts)

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात नुकताच शिवसंपर्क अभियानाला प्रारंभ झाला आहे. याच पार्श्वभूमीवर येथील शासकीय विश्रामगृहामध्ये आज (मंगळवारी) मृदा व जलसंधारण राज्यमंत्री शंकरराव गडाख, शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीरामपूर तालुक्यात शिवसंपर्क अभियाला सुरुवात झाली. त्यावेळी राज्यमंत्री गडाख बोलत होते.

प्रारंभी शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडदे यांनी प्रास्ताविक केले. माजी आमदार भाऊसाहेब कांबळे व खासदार सदाशिव लोखंडे यांची भाषणे झाली.

गडाख म्हणाले, इतर राजकीय पक्ष निवडणुका समोर आल्यानंतर शेतकऱ्यांची खोटी कर्जमाफी करतात. मात्र मुख्यमंत्री ठाकरे यांनी सत्तेत आल्यानंतर प्राधान्याने शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न सोडविला. तसेच सरकार स्थापन झाल्यानंतर ते अनेक धडाडीचे निर्णय घेणार होते. परंतु कोरोनाच्या संकटनामुळे त्यांना अनेक अडीअडचणींना तोंड द्यावे लागले. कोरोनाच्या संकटात केंद्रातील सरकार सारख्या थाळ्या राज्य सरकारने वाजविल्या नाहीत. तर प्रमाणिकपणे काम करून कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी वेळोवेळी जनतेसमोर येऊन कुटूंबातील एका व्यक्तीप्रमाणे मार्गदर्शन करुन जनतेला कोरोना सावरले. त्यामुळे राज्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याचे राज्यमंत्री गडाख यांनी सांगितले.

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com