तहसीलदारांनी आढावा बैठकीकडे फिरविली पाठ; आमदार राजळे संतप्त

प्रशासकीय प्रमुख असलेल्या तहसीलदारांना परिस्थितीचे गांभीर्य नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. तहसीलदारांचे काम आमदारांच्या प्रोटोकॉलपेक्षा व तालुक्यातील प्रश्‍नांपेक्षा महत्त्वाचे वाटले का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तहसीलदारांनी आढावा बैठकीकडे फिरविली पाठ; आमदार राजळे संतप्त
Monika rajale.jpg

शेवगाव : तालुक्यातील विविध प्रश्‍नांचा आढावा घेण्यासाठी काल आमदार मोनिका राजळे (Monika rajale) यांनी आढावा बैठक घेतली; मात्र तहसीलदार बैठकीस उपस्थित न राहिल्याने आमदार राजळे यांनी त्याबाबत थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांची तक्रार केली. (Tehsildar turns to review meeting; MLA Rajale angry)

लांबलेल्या पावसामुळे खरीप हंगाम वाया जाण्याची स्थिती, तालुक्यातील आरोग्य सुविधा, लसीकरण, भविष्यातील कोरोना संदर्भातील उपाययोजना, वैयक्तिक लाभाच्या योजना, महसूल व इतर विभागांतील प्रलंबित कामे यांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलाविली होती. प्रांताधिकारी देवदत्त केकाण बैठकीस उपस्थित होते. मात्र, तहसीलदार अर्चना भाकड बैठकीस अनुपस्थित राहिल्या. त्यामुळे विधानसभा अधिवेशनाचे कामकाज संपवून मुंबई येथून थेट बैठकीसाठी आलेल्या आमदार राजळेंचा पारा चढला. या वेळी तहसीलदार नगरला जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीस गेल्याचे सांगण्यात आले. याबाबत माहिती घेतली असता, अशी कोणतीही बैठक आयोजित केली नसल्याचे समजले.

तालुक्याच्या प्रशासकीय प्रमुख असलेल्या तहसीलदारांना परिस्थितीचे गांभीर्य नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. तहसीलदारांचे काम आमदारांच्या प्रोटोकॉलपेक्षा व तालुक्यातील प्रश्‍नांपेक्षा महत्त्वाचे वाटले का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तहसीलदारांच्या या बेजबाबदार वर्तनाची तक्रार जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व महसूलमंत्र्यांकडे करून, योग्य ती कारवाई करण्याचे पत्र त्यांनी तत्काळ दिले.

नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा

बैठकीस उपस्थित नागरिकांनी व पदाधिकांऱ्यानी आमदार राजळे यांच्यापुढे तहसीलदारांच्या तक्रारींचा पाढा वाचला. प्रकरणे प्रलंबित ठेवणे, लोकांना दुरुत्तरे करणे, नागरिकांचे म्हणणे ऐकून न घेणे, लोकप्रतिनिधींनी सुचविलेली कामे प्रलंबित ठेवणे, अशा अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या.
 

हेही वाचा..

ग्रामसुरक्षा दलाचे काम उल्लेखनीय

सिद्धटेक : ‘‘आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून उभारलेला तपासणी नाका या भागासाठी महत्त्वाचा आहे. प्रत्येक व्यक्तीने पोलिसिंगचे काम केल्यास गुन्हे रोखता येतील. युवकांच्या माध्यमातून ग्रामसुरक्षा दल उल्लेखनीय काम करीत आहे,’’ असे प्रतिपादन पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी केले.

कुळधरण (ता. कर्जत) येथे जाधव यांच्या हस्ते तपासणी नाक्याचे उद्‍घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून व कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून हा तपासणी नाका उभारण्यात आला. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उद्योजक महेंद्र गुंड, प्रशासक सी. एम. पवार, पोलिस पाटील समीर जगताप, बबन सुद्रिक, उमेश जगताप, प्रशांत अडसूळ, पोलिस कर्मचारी सुनील माळशिकारे, भाऊसाहेब यमगर, विकास चंदन आदी उपस्थित होते.
पोलिस निरीक्षक यादव यांनी प्रास्ताविक केले. गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार असल्याचे गुंड यांनी या वेळी जाहीर केले. सूत्रसंचालन प्रा. सोमनाथ गोडसे यांनी केले. समीर जगताप यांनी आभार मानले.

हेही वाचा..

दूध उत्पादकांना राज्य सरकारने दिलासा द्यावा

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in