स्वराज्याचा सर्वात उंच भगवा फडकणार खर्डा किल्ल्यावर

हा ध्वज भारतातील मुख्य धार्मिक ठिकाणी व पंढरपूरला फिरवला जाणारआहे. तसेच १५ ऑक्टोबरला हा"स्वराज्य ध्वज" खर्डा किल्ल्याच्या आवारात समारंभपूर्वक लावला जाणार असल्याचे आमदार पवार यांनीसांगितले.
Rohit pawar.jpg
Rohit pawar.jpg

जामखेड : मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात शेवटच्या विजयाचा साक्षीदार असलेला खर्डा (ता. जामखेड) येथील भुईकोट किल्ला आज पुन्हा चर्चेचा व औत्सुक्याचा विषय ठरत आहे. निमित्त आहे आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून देशातील स्वराज्याचा सर्वात उंच भगवा ध्वज उभारण्याचे.The tallest saffron flag of Swarajya will be hoisted on Kharda fort

ऐतिहासिक वास्तू ह्या प्रेरणास्थान व पर्यटकांसाठी पर्वणी ठराव्यात याकरिता आमदार रोहित पवार यांचा सातत्याने प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी
खर्डा (ता.जामखेड) येथील भूईकोट किल्ल्यात शौर्य, एकतेचं प्रतीक असलेला, ७४ मीटरचा, जगातील सर्वात मोठा भगव्या रंगाचा  "स्वराज्य ध्वज" लावला जाणार आहे. या "स्वराज्य ध्वजाचे" पूजन बारामती येथे राज्यस्तरीय भजन स्पर्धेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात संत-महंतांच्या हस्ते आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

हा ध्वज भारतातील मुख्य धार्मिक ठिकाणी व पंढरपूरला फिरवला जाणार आहे. तसेच १५ ऑक्टोबरला हा "स्वराज्य ध्वज" खर्डा किल्ल्याच्या आवारात समारंभपूर्वक लावला जाणार असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.

हेही वाचा...

खर्ड्याच्या किल्ल्यात फडकविण्यात येणाऱ्या भगव्या स्वराज्य ध्वजाचे संत-महंतांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यानंतर पुढील दोन महिने देशभरातील प्रमुख ७४ अध्यात्मिक व धार्मिक स्थळी, संतपीठांच्या ठिकाणी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यांवर हा ध्वज नेण्यात येणार आहे. तिथे पूजन केल्यानंतर शेवटी पंढरपूरच्या विठुरायाच्या अंगणात या ध्वजाची पूजा करून १५ ऑक्टोबरला मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत हा ध्वज खर्ड्याच्या किल्ल्यात अभिमानाने फडकविण्यात येणार आहे.

"हा भगवा रंगाचा स्वराज्य ध्वज कोणा एकाचा नसून सर्वांचा आहे. या ध्वजाच्या माध्यमातून कर्जत-जामखेड मतदारसंघाला नवी ओळख मिळवून देईल. हा ध्वज जगभरातील पर्यटकांचे आकर्षण ठरणारच पण सामर्थ्य, धैर्य, शक्ती, भक्ती, प्रगती याचं प्रतीक ठरेल व डौलाने फडकत राहील," असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com