नगरच्या आवर्तनाला स्थगिती; पुण्याची तीन आवर्तने पूर्ण - Suspension of city rotation; Pune completes three cycles | Politics Marathi News - Sarkarnama

नगरच्या आवर्तनाला स्थगिती; पुण्याची तीन आवर्तने पूर्ण

संजय आ. काटे
सोमवार, 10 मे 2021

कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून डाव्या कालव्याद्वारे सोडण्यात येणारे शेतीचे आवर्तन न्यायालयीन स्थगितीने थांबले आहे. त्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

श्रीगोंदे : कुकडी (Kukadi) प्रकल्पातून डाव्या कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या शेतीच्या आवर्तनाला स्थगिती मिळाल्याने विशेषत: नगरच्या (Nagar) शेतकऱ्यांची काळजी वाढली आहे. ही स्थगिती येण्यापूर्वीच पुणे जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पातील उन्हाळी आवर्तने होवून गेली होती. परिणामी पुण्याला बारमाही आणि नगरला आठमाही पाणी मिळते, हे वास्तव पुन्हा अधोरेखित झाले. (Suspension of city rotation; Pune completes three cycles)

कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून डाव्या कालव्याद्वारे सोडण्यात येणारे शेतीचे आवर्तन न्यायालयीन स्थगितीने थांबले आहे. त्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. परिणामी जुन्नर, पारनेर, श्रीगोंदे, कर्जत व करमाळा तालुक्‍यांतील शेतीचे नुकसान होण्याची चिन्हे आहेत. 

पिंपळगाव जोगेसह माणिकडोह, वडज व डिंबे धरणांतील उन्हाळी हंगामातील शेतीचे आवर्तने पूर्ण झाल्यानंतर ही याचिका दाखल केली. त्यानंतर न्यायालयाने कुकडी प्रकल्पातील सगळ्या आवर्तनांना स्थगिती दिली. त्याचा सर्वाधिक फटका डाव्या कालव्याला म्हणजे नगर व करमाळा तालुक्‍यांना बसणार आहे. आता ही स्थगिती उठवावी, यासाठी बाळासाहेब नाहाटा, राजेंद्र म्हस्के, राहुल जगताप, अण्णा शेलार, घनश्‍याम शेलार, कैलास शेवाळे या नेत्यांनी वेगवेगळी याचिका दाखल केली आहे. 
आवर्तनातील कळीचा मुद्दा म्हणजे, पिंपळगाजोगे धरणातील अचलसाठा काढून त्यातून शेतीचे आवर्तन करता येत नाही, हे कालवा सल्लागार समिती सदस्यांच्या लक्षात का आले नाही.

समितीचे सचिव असणारे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळे हे श्रीगोंद्याचे सुपुत्र आहेत. त्यांच्याही ही बाब लक्षात न आल्याने ते खटकते. याच बैठकीत होणाऱ्या आवर्तनात कुठल्याही पाझर तलावात पाणी सोडायचे नाही, असे स्पष्ट करण्यात आल्याने लाभक्षेत्रात पिण्याचे पाण्याची गरज नाही, हेही समोर आले आहे. 

हेही वाचा...

राम शिंदेंकडे रुग्णांच्या व्यथा

तीन जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांचे प्रस्तावच नाहीत 

दरम्यान, आता जर पिंपळगावजोगे धरणातील अचल साठा पिण्याच्या आवर्तनासाठी मागण्याची वेळ आली, तर त्यासाठी पुण्यासह नगर व सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचे पिण्याच्या पाण्यासाठीचे मागणी प्रस्ताव यापूर्वीच दाखल होणे अपेक्षित होते. तसे झालेले नसल्याची खात्रिशीर माहिती आहे. त्यामुळे यातही अडचणी येणार असल्याने 12 मे रोजी न्यायालय काय निर्णय देते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. 

 

 

 

 

 

 

Edited By  - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख