विनायक देशमुखांच्या पाठपुराव्याला यश ! निर्देशिका अद्यावत करण्याबाबत मंत्री अमित देशमुखांचे आदेश - Success in the pursuit of Vinayak Deshmukh! Minister Amit Deshmukh's order to update the directory | Politics Marathi News - Sarkarnama

विनायक देशमुखांच्या पाठपुराव्याला यश ! निर्देशिका अद्यावत करण्याबाबत मंत्री अमित देशमुखांचे आदेश

मुरलीधर कराळे
बुधवार, 14 जुलै 2021

प्रत्येक जिल्ह्याची निर्देशिका (गॅझेटियर) अद्ययावत असणे आवश्यक आहे.मात्र गेले अनेक वर्षे त्याकडे कोणत्याही सरकारने लक्ष दिलेले नाही. पर्यटक, स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी, इतिहासप्रेमींसाठी ही माहिती आवश्यक असते.

नगर : महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक जिल्ह्यांच्या निर्देशिका अद्ययावत झालेल्या नाहीत. काहींचे मराठी भाषांतर झालेले नाही. नगर जिल्ह्याची निर्देशिकाही अद्ययावत नाही. त्यामुळे स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करीत असलेल्या विद्यार्थ्यांची मोठी अडचण होत आहे. याबाबत तातडीने कार्यवाही व्हावी, अशी मागणी काॅंग्रेसचे राज्य सरचिटणीस विनायक देशमुख यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली. त्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला. निर्देशिका लवकरच अद्ययावत केल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. (Success in the pursuit of Vinayak Deshmukh! Anil Deshmukh's order to update the directory)

याबाबत माहिती देताना विनायक देशमुख म्हणाले, की प्रत्येक जिल्ह्याची निर्देशिका (गॅझेटियर) अद्ययावत असणे आवश्यक आहे.मात्र गेले अनेक वर्षे त्याकडे कोणत्याही सरकारने लक्ष दिलेले नाही. पर्यटक, स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी, इतिहासप्रेमींसाठी ही माहिती आवश्यक असते. याबरोबरच अनेक प्रकल्पांसाठी अधिकृत माहिती असणे गरजेचे असते. बहुतेक जिल्ह्यांच्या माहितीमध्ये नव्याने झालेल्या घडामोडींचा परामर्श घेतला गेला नाही. त्यामुळे अनेकांना अडचणी येत आहेत.

याबाबत देशमुख यांनी मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहात मंत्री अमित देशमुख यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. निवेदनात त्यांनी म्हटले आहे, की ब्रिटिश राजवटीत 1884 साली जिल्ह्यांचे गॅझिटिअर्स तयार करण्यात आले होते. त्यानंतर वेळोवेळी ते अद्ययावत करण्यात आले. तथापि, मागील 40 ते 50 वर्षांत हे गॅझिटिअर्स अद्ययावत झाले नाही. ऐतिहासिक व धार्मिक अशा नगर जिल्ह्याचे गॅझिटिअर्स 1976 ला अद्ययावत झाले होते. त्यानंतर तब्बल 45 वर्षात ते अद्ययावत झाले नाही.

याबाबत लक्ष घालावे, अशी मागणी देशमुख यांनी मंत्र्यांकडे केली. मंत्री अमित देशमुख यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या असून, याबाबत लवकरच कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिल्याचे विनायक देशमुख यांनी सांगितले.

 

 

हेही वाचा..

मी बाप नाही, तर जनतेचा सेवक

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख