स्वच्छ, सुंदर, हरित नगर संकल्पनेत आमदार संग्राम जगताप यांचे बळ

नगरमध्ये उपमहापौर गणेश भोसले यांच्या संकल्पनेतून आजपासून महिन्यातून दोनदा स्वच्छता अभियान राबविले जाणार आहे. स्वच्छतेतून नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी मदत होते.
sangram jagtap.jpg
sangram jagtap.jpg

नगर : संत गाडगेबाबा यांनी हातात झाडू घेऊन संपूर्ण महाराष्ट्राला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आहे. केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियान राबवून शहरांमध्ये स्वच्छता स्पर्धेचे आयोजन केले आहे. याचबरोबर महाराष्ट्र सरकारने माझी वसुंधरा अभियान राबविले आहे.

नगरमध्ये उपमहापौर गणेश भोसले यांच्या संकल्पनेतून आजपासून महिन्यातून दोनदा स्वच्छता अभियान राबविले जाणार आहे. स्वच्छतेतून नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी मदत होते. स्वच्छ, सुंदर, हरित नगरच्या संकल्पनेत नगरकरांनी सामील व्हावे, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

नगर महापालिकेतर्फे शहरात स्वच्छता मोहीम राबविताना आमदार संग्राम जगताप, महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त शंकर गोरे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, दत्ता कावरे, उपायुक्त यशवंत डांगे, शहर अभियंता सुरेश इथापे, घनकचरा विभागप्रमुख डॉ. शंकर शेडाळे, उद्यान विभागप्रमुख मेहेर लहारे, के. के देशमुख आदी उपस्थित होते.

महापौर शेंडगे म्हणाल्या, की नगर शहरात आता महापालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटावे व समाजामध्ये जागृती व्हावी, यासाठी महापालिका स्वच्छतेचे काम करणार आहे, असे त्या म्हणाल्या.
उपमहापौर गणेश भोसले म्हणाले, की आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये महिन्यातून दोन दिवस स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. यामध्ये घनकचरा विभाग, उद्यान विभाग, बांधकाम विभाग व अतिक्रमणविरोधी विभाग सहभागी होणार आहेत. शहरातील एकेका भागात जाऊन स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. आज राबविलेल्या स्वच्छता मोहिमेचे शहरवासीयांनी कौतुक केले आहे. त्यामुळे महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना उत्साह मिळाला आहे. केंद्र व राज्य सरकार स्वच्छतेबाबत वेगवेगळे उपक्रम राबवीत असतात. महापालिकेनेही स्वच्छतेचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

बसस्थानक परिसर, आंबेडकर रस्ता, टिळक रस्ता, माळीवाडा वेस, आयुर्वेद महाविद्यालय परिसरामध्ये आज स्वच्छता मोहीम राबविली गेली. यामध्ये रस्त्यावरील माती, गवत, दगडगोटे व अतिक्रमणे काढण्यात आली.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com