घरीच थांबा, मधुकर पिचड यांनी ज्येष्ठांना दिला संदेश - Stay at home, Madhukar Pichad gave a message to the elders | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

घरीच थांबा, मधुकर पिचड यांनी ज्येष्ठांना दिला संदेश

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 14 एप्रिल 2021

राजूर येथील आदिवासी विकास विभागाचे मुलांचे व मुलींचे वसतिगृह तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था या तीन ठिकाणी कोरोना केयर सेंटर उभारण्यात आले.

अकोले : तालुक्‍यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. त्यामुळे पुढील काळात अतिशय सावध राहण्याची गरज असून, ज्येष्ठ व्यक्तींनी शक्‍यतो घरात थांबून प्रशासनाला मदत करा, असे आवाहन माजी मंत्री मधुकर पिचड यांनी केले. 

पिचड यांच्या सुचनेप्रमाणे राजूर येथे 200 बेडचे कोविड केंद्र सुरू करण्यात आले. माजी आमदार वैभव पिचड, तहसीलदार मुकेश कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंद्रजित गंभिरे, सरपंच गणपत देशमुख, सहायक फौजदार नितीन खैरनार, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीराम पन्हाळे, सुधीर ओहरा, भास्कर एलमामे आदी या वेळी उपस्थित होते. 

राजूर येथील आदिवासी विकास विभागाचे मुलांचे व मुलींचे वसतिगृह तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था या तीन ठिकाणी कोरोना केयर सेंटर उभारण्यात आले. त्यासाठी जेवणाची व्यवस्था राजूर ग्रामपंचायत, औषधांचे नियोजन व्यापारी संघटने केले. तर स्वच्छतेसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी जबाबदारी घेतली. 

या वेळी वैभव पिचड म्हणाले, की आपले "कुटुंब आपली जबाबदारी'साठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असून, इंजेक्‍शन, ऑक्‍सिजन याचा मोठा तुटवडा होत आहे. त्यासाठी तालुक्‍यातील जनतेने सामाजिक भावनेतून आपण सुरक्षित राहून इतरांना मदत करा. अकोले, राजूर येथे कोरोना केयर सेंटर सुरू करण्यात येत असून, यासाठी दात्यांनी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. 
 

हेही वाचा..

परीक्षा पुढे ढकलाव्यात

संगमनेर : कोरोनाच्या प्रादुर्भाव काळात होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी छात्रभारती या विद्यार्थी संघटनेने प्रांताधिकाऱ्यांद्वारे राज्याचे मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना निवेदनाने केली आहे.

निवेदनात म्हटले आहे, की राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या अधीक धोकादायक लाटेमुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसेदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येमुळे सर्वसामान्यांच्या मनात भिती निर्माण झाली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या परिस्थिती परीक्षा घेणे व विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव कमी होईपर्यंत दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात व विद्यार्थी तसेच पालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.

या निवेदनावर छात्रभारतीचे राज्य उपाध्यक्ष अनिकेत घुले, जिल्हा कार्याध्यक्ष तुषार पानसरे, तालुका अध्यक्ष राहुल जऱ्हाड, सचिव तृप्ती जोर्वेकर, सोमनाथ फापाळे, गौरी राऊत, ऋषीकेश वाकचौरे, हर्षल कोकणे आदिंच्या सह्या आहेत.
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख