आमदार संग्राम जगताप यांनी मागणी करताच शरद पवारांनी `रेमडेसिविर` पाठविले - As soon as MLA Sangram Jagtap demanded, Sharad Pawar sent a remediation | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

आमदार संग्राम जगताप यांनी मागणी करताच शरद पवारांनी `रेमडेसिविर` पाठविले

सरकारनामा ब्युरो
रविवार, 11 एप्रिल 2021

आमदार संग्राम जगताप यांनी तातडीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी संपर्क साधून रेमडेसिविर इंजेक्‍शनचा तुटवडा जाणवत असताना दूरध्वनी करून माहिती दिली.

नगर : जिल्ह्यातील रेमडेसिवीर इंजेक्‍शनचा तुटवडा पाहता मागील वर्षी प्रमाणेच यंदाही आमदार संग्राम जगताप यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना संपर्क साधून इंजेक्‍शनची मागणी केली. त्यानंतर तातडीने शरद पवार यांनी आमदार रोहित पवार यांच्या मार्फत रेमडेसिवीरचा साठा पाठविला. हा साठा आज आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केला. 

तीन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासोबत रेमडेसिवीर इंजेक्‍शनचा तुटवडा बाबत बैठक घेण्यात आली होती. या वेळी असे निदर्शनास आले की जिल्हा भरातून येणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नगर शहरामधील हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात असलेल्या रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्‍शनचा तुटवडा जाणवत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी तातडीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी संपर्क साधून रेमडेसिविर इंजेक्‍शनचा तुटवडा जाणवत असताना दूरध्वनी करून माहिती दिली.

शरद पवार यांनी तातडीने आमदार रोहित पवार यांच्या मार्फत रेमडेसिवीरचा साठा पाठविला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे रेमडेसिविर इंजेक्‍शन प्रशासनाकडे आमदार संग्राम जगताप यांनी सुपूर्द केली. या वेळी सुजित काकडे उपस्थित होते. 

औषध कमी पडणार नाही

नगर शहरासह जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती बाबतचा प्रशासनाकडून दररोज आढावा घेऊन मी राज्याच्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी संपर्कात आहे. कुठलेही औषध कमी पडून देणार नाही, असे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले आहे, असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.

 

हेही वाचा...

प्रत्येक प्रभागात स्थापन होणार "कोरोना सुरक्षा समिती' 

कोपरगाव : शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभागनिहाय "कोरोना सुरक्षा समिती' स्थापन करण्यात येणार आहे. त्यात प्रत्येक प्रभागातील दोन नगरसेवक व त्याच प्रभागातील चार नागरिकांचा समावेश असेल. समितीत काम करू इच्छिनाऱ्यांनी 12 एप्रिल पर्यंत उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले आहे. 

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, शहरात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या समितीद्वारे प्रभागातील कोरोनाबाधितांची नांवे, उपचार घेत असलेले ठिकाण, त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांची माहिती, कोरोनाची लक्षणे आढळून येणाऱ्या व्यक्तींची नावे, नगरपालिकेला कळविण्यात येणार आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीही ही समिती जनजागृती करणार आहे. नगरसेवकांना अशा समित्या स्थापन करण्याचे लेखी कळविले आहे, असेही शेवटी वहाडणे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख