मंत्र्यांच्या बैठकित अधिकारी टीशर्टवर दिसताच जिल्हाधिकाऱ्यांनी बाहेर हाकलले - As soon as the ministerial meeting officer appeared on the T-shirt, the district collector kicked him out | Politics Marathi News - Sarkarnama

मंत्र्यांच्या बैठकित अधिकारी टीशर्टवर दिसताच जिल्हाधिकाऱ्यांनी बाहेर हाकलले

गाैरव साळुंके
सोमवार, 12 एप्रिल 2021

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा काल श्रीरामपूरला दाैरा होता. या वेळी कोरोनाचा आढावा तसेच इतर विषयांवर बैठकांचे नियोजन करण्यात आले होते.

 

श्रीरामपूर : नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी आढावा बैठकीला टीशर्ट घालून आले होते. या बैठकीत माहिती सादर करण्यासाठी ते उठले असता ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांची झाडाझडती घेतली. मंत्र्यांच्या दौऱ्यात अशा प्रकारे येता येते का? असा सवाल करत बैठकीतून बाहेर जाण्याची सूचना केली. त्यानंतर ते बाहेर गेले. 

त्याचे झाले असे ः महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा काल श्रीरामपूरला दाैरा होता. या वेळी कोरोनाचा आढावा तसेच इतर विषयांवर बैठकांचे नियोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसलेही उपस्थित होते. नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी या बैठकिस टीशर्टवर आले. हे जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला झाडले. एव्हढेच नव्हे, तर बैठकीतून बाहेर जाण्याची सूचना केली. त्यामुळे ते अखेर बाहेर गेले. या प्रकारामुळे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेला वेगळी चपराक बसली.

हेही वाचा..

कोरोनाच्या नव्या 2210 रुग्णांची वाढ 

नगर : कोरोना रुग्णवाढीचा आलेख कायम आहे. रोज दोन हजारांपेक्षा जास्त रुग्ण वाढत आहेत. यामुळे अनेक रुग्णालये पूर्ण क्षमतेने भरली आहेत. शनिवारी (ता. 10) दिवसभरात नवे 2210 रुग्ण वाढले. 

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत 960, खासगी प्रयोगशाळेत 484, रॅपिड अँटिजेन चाचणीत 766 रुग्ण आढळून आले. शहरातील सर्वाधिक रुग्णांची संख्या कायम आहे. शहरात 534 रुग्ण आढळून आले. उपचार सुरू असलेल्यांची संख्या 12 हजार 61 झाली आहे. 

तालुकानिहाय रुग्ण याप्रमाणे ः राहाता 183, संगमनेर 163, श्रीरामपूर 162, कर्जत 150, राहुरी 140, नगर 115, अकोले 111, शेवगाव 107, पारनेर 105, कोपरगाव 87, जामखेड 81, पाथर्डी 60, श्रीगोंदे 51, भिंगार उपनगर 50, लष्करी रुग्णालय 14, तर अन्य जिल्ह्यांतील 10 रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या एक लाख 13 हजार 633 झाली आहे. आतापर्यंत एक हजार 282 रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98वरून 88 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आले आहे. दिवसभरात एक हजार 996 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एक लाख 290 रुग्ण बरे झाले आहेत. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख