देशमुखांच्या घरावर ईडीचा छापा पडताच मंत्री थोरात भाजपवर कडाडले

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर काल (शुक्रवारी) ईडी व सीबीआयच्या पथकाने छापे घातले.
balasaheb thorat 1.jpg
balasaheb thorat 1.jpg

संगमनेर : भाजपची (Bjp) सत्ता नसलेल्या राज्यांत सक्तवसुली संचालनालय (ईडी) व केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) यांसारख्या संस्थांचा गैरवापर करून केंद्र सरकार राजकारण करू पाहत आहे. हा प्रकार दुर्दैवी असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. (As soon as the ED raided Deshmukh's house, Minister Thorat slammed the BJP)

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ऑक्सिजन प्रकल्पाच्या उद्‍घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर काल (शुक्रवारी) ईडी व सीबीआयच्या पथकाने छापे घातले. याबाबत थोरात यांना विचारणा केली असता, केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करून राजकारण करू पाहत आहे; मात्र यातून काहीही निष्पन्न होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

साई संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीचा निर्णय दोन आठवड्यांनी लांबणीवर टाकल्यासंदर्भात बोलताना थोरात यांनी, हा वादाचा विषय नसून, काही नावे अंतिम करायची असून, कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी थोडा वेळ घेतला आहे. मात्र, कधीही ही नावे जाहीर होऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा..

शिक्षक परिषदच शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देईल

टाकळी ढोकेश्वर : प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षक परिषद सातत्याने पाठपुरावा करीत आहे. शिक्षक बँकेत पारदर्शी कारभार करणे व विविध समस्यांबाबत शिक्षकांना न्याय देण्याची कुवत फक्त शिक्षक परिषदेतच असल्याने, आपण शिक्षक परिषदेत आलो, असे सदिच्छा मंडळाचे तालुकाध्यक्ष संतोष खामकर यांनी सांगितले.

टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथे झालेल्या कार्यक्रमात सदिच्छा मंडळाचे तालुकाध्यक्ष संतोष खामकर, बाळासाहेब ठाणगे, विजय वाळुंज, संदीप रोकडे, सुदाम साळुंके, सुनील रोकडे, संतोष नरसाळे यांनी राज्य शिक्षक परिषद व गुरुमाऊली मंडळात प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. रावसाहेब रोहकले, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे, उपाध्यक्ष संजय शेळके, विकास डावखरे, भिवसेन पवार, भाऊसाहेब ढोकरे, गणेश वाघ, बाबूराव कदम उपस्थित होते.

प्रवीण ठुबे म्हणाले, की गेल्या दोन वर्षांत शिक्षक परिषदेचे काम जिल्हाभरातील वाड्या-वस्त्यांवरील शिक्षकांपर्यंत पोचविण्याचे कार्य केल्यामुळे शिक्षकांमध्ये शिक्षक परिषदेबद्दल विश्वास निर्माण झाला आहे.

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com