आवर्तनाबाबत स्नेहलता कोल्हे यांचे अभियंत्यांना आदेश

जलसंपदा खात्याने तातडीने पावले उचलून नांदूर मधमेश्वर जलद कालव्यातून आवर्तन सोडून शेतकरीवगार्गसह सर्वांना दिलासा द्यावा.
आवर्तनाबाबत स्नेहलता कोल्हे यांचे अभियंत्यांना आदेश
Snehalata kolhe.jpg

कोपरगाव : नांदूर मधमेश्वर जलद प्रकल्पांतर्गत भावली धरण ओव्हरफ्लो झाले असून, याभागात पावसाने दडी मारल्याने तातडीने पाण्याचे आवर्तन सोडून त्याद्वारे गावतळे, बंधारे भरून द्यावे, अशी मागणी भाजप प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी कार्यकारी अभियंता वैजापूर यांच्याकडे केली आहे.

त्या म्हणाल्या की, गेल्या दोन महिन्यापासून पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे नागरिकांचे, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकल्पांतर्गत भावली धरण पूर्णपणे भरलेले आहे. एक व दोन वितरीका वरील पाणीवापर संस्थांचे पदाधिकारी, विविध गावचे सरपंच, शेतकरी आदींनी पाण्याचे आवर्तन सोडवे म्हणून मागणी केली आहे. या भागातील विहिरी, बंधारे, गावतळे कोरडी पडली आहेत. त्यात पाणी सोडल्यास त्याचा फायदा आसपासच्या परिसरास होणार आहे व पिण्याच्या पाण्याचे संकट कमी होईल. तरी जलसंपदा खात्याने तातडीने पावले उचलून नांदूर मधमेश्वर जलद कालव्यातून आवर्तन सोडून शेतकरीवगार्गसह सर्वांना दिलासा द्यावा.

हेही वाचा...

सोनईत 'खावटी'अनुदान अंतर्गत लाभार्थ्यांना धान्याचे वाटप

सोनई : सोनई येथील जगदंबादेवी मंदीर सभागृहात शासनाच्या आदिवासी विकास विभागाद्वारे लाभार्थ्यांना खावटी अनुदान योजनेतून अन्न धान्य किट वाटपाचा कार्यक्रम माजी पंचायत समितीच्या सभापती सुनिता गडाख यांच्या हस्ते झाला.

नेवासे तालुक्यात या योजनेचे १७६१ लाभार्थी असून, सोनई व नेवासे येथे वितरण कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास नेवासेचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे, मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, बाजार समितीचे सभापती डाॅ. शिवाजी शिंदे, गटविकासाधिकारी शेखर शेलार, आदिवासी विकासचे अधिक्षक दत्तात्रेय लष्करे, सहायक प्रकल्प अधिकारी सुनिल बारसे उपस्थित होते.

आदिवासी विभागाची ही योजना अतिशय लाभदायी असून, खावटी अनुदान योजनेच्या माध्यामातून शासनाच्या वतीने होणारी मदत कोरोनाच्या संकटात गोरगरीब व गरजू लाभार्थींना मोलाची ठरणार आहे, असे गडाख यांनी आपल्या भाषणात सांगितले.

पन्नास टक्के रोख रक्कम व पन्नास टक्के वस्तू स्वरूपात केली जाणारी ही मदत दिलासादायक आहे. असेही त्यांनी सांगितले.

नेवासा तालुक्यात एकूण १७६१ लाभार्थी आहेत. या सर्वांना अन्न धान्य वितरण करण्यात येणार असून १६७३ लाभार्थाच्या खात्यावर डीबीटी द्वारे दोन हजार रूपये जमा केले आहेत उर्वरित ७६ लाभार्थीचे खाते बंद असल्यामुळे रक्कम वर्ग झाली नसुन ती देखील लवकरच वर्ग करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. लाभार्थ्यांनी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या कार्य तत्परतेचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in