साहेब, पाठीवर फक्त तुमची थाप हवी ! आमदार आशुतोष काळेंनी घेतले शरद पवारांचे आशिर्वाद

या कामगिरीची दखल घेत ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
Aushutosh kale.jpg
Aushutosh kale.jpg

कोपरगाव : कोविड (Covid-19) आपत्तीच्या मुकाबल्यासाठी तहानभूक विसरून गावोगावी भ्रमंती. सव्वाशे ऑक्‍सिजन बेड, साडेचारशे बेडचे सुसज्ज कोविड सेंटर आणि दोन ऑक्‍सिजन निर्मिती प्लॅंटची उभारणी. जोडीला उसाला सर्वाधिक भाव, अशी चौफेर कामगिरी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे (Aushotosh Kale) यांनी केली आहे. (Sir, all you need is a pat on the back! MLA Ashutosh Kale took the blessings of Sharad Pawar)

या कामगिरीची दखल घेत ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. "या लढाईत स्वतःच्या तब्येतीचीदेखील काळजी घे' असा सल्ला त्यांनी आमदार काळे यांना दिला. 

"साहेब, पाठीवर फक्त तुमची थाप हवी' अशा शब्दांत काळे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. काळे यांनी आज श्री. पवार यांची मुंबई येथील सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेनंतर श्री. पवार यांनी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. काळे यांनी पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, नगर जिल्ह्यात सर्वप्रथम कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यामार्फत ऑक्‍सिजननिर्मिती प्लॅंट उभारण्याचा निर्णय जाहीर केला. त्यापाठोपाठ सरकारी निधीतून ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात दुसऱ्या प्लॅंटउभारणीचे कामदेखील सुरू केले. 

पहिल्या कोविड लाटेप्रमाणे दुसऱ्या लाटेतही मतदारसंघातील तब्बल 80 हजार कुटुंबांपर्यंत मोफत सॅनिटायझर वितरित केले. सरकारी यंत्रणेला गती देण्यासाठी कोविड चाचणीची चार हजार किट उपलब्ध करून दिली. ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर सुविधा असलेल्या अतिदक्षता विभागासह तीस ऑक्‍सिजन बेड व "एसएसजीएम' महाविद्यालयात शंभर ऑक्‍सिजन बेड उपलब्ध करून दिले. साडेचारशे बेडचे सुसज्ज कोविड सेंटर उभारले. ऑक्‍सिजन सुविधा असलेली रुग्णवाहिका रुग्णसेवेत दाखल केली. प्रथमच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वर्तुळात त्यांच्या या कार्याची दखल घेण्यात आली. आज श्री. पवार यांनी त्यांची पाठ थोपटली. 

व्यापक व्यवस्था उभारू

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपण कोपरगाव विधानसभा मतदारसंघात एकाच वेळी दोन ऑक्‍सिजन प्लॅंट उभारण्यात पुढाकार घेतला. कोविड मुकाबल्यासाठी व्यापक व्यवस्था उभारू शकलो, याचे समाधान वाटते. 

- आशुतोष काळे, आमदार, राष्ट्रवादी कॉंग्रेस 

हेही वाचा...

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com