श्रीगोंद्याचे तहसीलदार प्रदीप कुमार पवार यांची तडकाफडकी उचलबांगडी

पवार हे शिरूर तालुक्यातील असून, श्रीगोंद्याची त्यांना इत्थंभूत माहिती असल्याने त्यांचा कार्यकाल चांगला जाईल अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या तीन महिन्यात लोकांना विश्वासात न घेता केलेले काम यांच्या अडचणीत आल्याचे लक्षात येते.
श्रीगोंद्याचे तहसीलदार प्रदीप कुमार पवार यांची तडकाफडकी उचलबांगडी
Pradeep1.jpg

श्रीगोंदे : साडे आठ महिन्यापूर्वी येथे हजर झालेले तहसीलदार प्रदीपकुमार पवार यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे.  शेतकऱ्यांच्या मदत अनुदान वाटपात झालेल्या हलगर्जीपणाचा ठपका ठेवून त्यांची बदली केल्याचे बदली आदेशात म्हटले असले तरी या बदलीला अनेक किनारी आहेत. 

पवार हे शिरूर तालुक्यातील असून, श्रीगोंद्याची त्यांना इत्थंभूत माहिती असल्याने त्यांचा कार्यकाल चांगला जाईल अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या तीन महिन्यात  लोकांना विश्वासात न घेता केलेले काम यांच्या अडचणीत आल्याचे लक्षात येते.

हेही वाचा..

पवार यांच्या बदली या आदेशात म्हटले आहे, की पुरामुळे बाधित झालेल्या पात्र शेतकर्‍यांना मदत अनुज्ञेय असताना सदर मदतीचे वाटत न करताच दोन कोटी बारा लाख इतक्या रकमेची अनुदान समर्पित केलेले आहे. तसेच अजूनच येथील पुरामुळे बाधित झालेल्या 383 खातेदारांपैकी 206 बाधित खातेदारांना होणारी मदत विविध कारणामुळे देण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे चार गावातील 36 शेतकऱ्यांना पात्र मर्यादा पेक्षा अतिरिक्त क्षेत्रासाठी मदतीचे वाटप पवार यांनी केलेले आहे. त्यानुसार श्री. पवार यांची यांनी  शासकीय कर्तव्य व जबाबदारी तत्परतेने पार पडलेली नाही. यास्तव महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांचे बदल्यांची विधी नियम आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मधील कलम ४(५)  नुसार त्यांची बदली करण्यात येत आहे त्यांना आता पुनर्वसन अधिकारी केवडिया कॉलनी जिल्हा नंदूरबार या रिक्त पदावर पाठविण्यात आले आहे.

पवार यांच्या जागी आता मिलिंद कुलथे यांची वर्णी लागू शकते अशी चर्चा आहे.
 
हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Related Stories

No stories found.