भेडे गोळीबार प्रकरणाला कलाटणी मिळणार? मित्रांनीच घडविले नाट्य - Shooting drama created by friends! Will the sheep shooting case get a twist? | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.

भेडे गोळीबार प्रकरणाला कलाटणी मिळणार? मित्रांनीच घडविले नाट्य

सुनील गर्जे
बुधवार, 5 मे 2021

भेंडे शिवारातील लांडेवाडी येथे देवगाव रस्त्यालगत असलेल्या एका वसाहतीतील मैदानावर रविवारी (ता. दोन) रात्री साडेनऊच्या सुमारास व्हॉलिबॉल खेळत असताना सोमनाथ तांबे याच्यावर अंधारात दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांपैकी एकाने गोळी झाडली.

नेवासे : नेवासे पोलिसांनी (Police) केलेल्या बारा तासांच्या मॅरेथॉन तपासानंतर भेंडे येथे रविवारी रात्री झालेल्या गोळीबार प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. जुन्या वादातून आपल्या विरोधातील व्यक्तीला गुन्ह्यात फसविण्याच्या उद्देशाने जखमी सोमनाथ तांबे (वय 21) याच्या मित्रांनीच हे गोळीबाराचे नाट्य घडवून आणल्याचा पोलिसांना संशय आहे. नेवासे पोलिसांनी याप्रकरणी तब्बल 19 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. (Shooting drama created by friends! Will the sheep shooting case get a twist?)

भेंडे शिवारातील लांडेवाडी येथे देवगाव रस्त्यालगत असलेल्या एका वसाहतीतील मैदानावर रविवारी (ता. दोन) रात्री साडेनऊच्या सुमारास व्हॉलिबॉल खेळत असताना सोमनाथ तांबे याच्यावर अंधारात दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांपैकी एकाने गोळी झाडली. त्यात तांबे जखमी झाला होता. दरम्यान, त्याला उपचारासाठी मित्रांनी नेवासे फाटा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी तांबेचा जबाब घेऊन फिर्याद घेतली होती. त्यात त्याने कुकाणे येथील दोघांवर संशय व्यक्त केल्याने, पोलिसांनी दोघांवर त्याच रात्री खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून संशयितांना अटक केली. 

हेही वाचा...

आता राज्यपातळीवर निर्णय व्हावा

दरम्यान, घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे, पोलिस निरीक्षक विजय करे यांनी भेट देऊन पाहणी केली. घटनेचे गांभीर्य ओळखून सर्व बाजू तपासून पाहिल्या असता, जखमी सोमनाथच्या जवळच्या दोन मित्रांनी जुन्या वादातील लोकांना अद्दल घडविण्याच्या उद्देशाने गोळीबाराचे नाट्य घडवून आणल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. 

या दोघांच्या दबावामुळेच सोमनाथने संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे घेतल्याचेही तपासात उघड झाल्याचे समजते. 

याप्रकरणी नेवासे पोलिसांनी तब्बल एकोणीस संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांतील काहींनी गुन्ह्याची कबुलीही दिल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून समजली. याबाबत बुधवारी (ता. 5) सकाळी नेवासे पोलिसांची पत्रकार परिषद होणार आहे. 

पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव 

याप्रकरणी दोन संशयित अटकेत असतानाही पोलिस निरीक्षक विजय करे त्यावर समाधानी नव्हते. त्यांनी जखमीबरोबरच व्हॉलिबॉल खेळणाऱ्यांच्या केलेल्या चौकशीत करे यांचा संशय बळावला. त्यांनी यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या दोघांना पोलिसी खाक्‍या दाखविताच खरा प्रकार उघड झाला. या तपासात करे यांना अपर पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कोणतेही पुरावे हाती नसताना अवघ्या बारा तासात खऱ्या गुन्हेगारांचा शोध लावल्याने नेवासे पोलिसांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

दरम्यान, या घटनेची महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे.

 

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख