शिवाजी कर्डिलेंनी योजना जाहीर केलीय, तुम्हीही जिंकाल एक लाखाचे `बक्षीस` - Shivaji Kardile has announced the plan, you too will win a 'prize' of one lakh | Politics Marathi News - Sarkarnama

शिवाजी कर्डिलेंनी योजना जाहीर केलीय, तुम्हीही जिंकाल एक लाखाचे `बक्षीस`

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 10 एप्रिल 2021

पालकमंत्री कधी तरी जिल्ह्यात येतात. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख व नगरविकास राज्यमंत्री प्राजक्‍त तनपुरेही जिल्ह्यात फिरत नाहीत.

नगर : कोरोना संकटात जनतेच्या समस्या सोडविण्याचे सोडून पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील तीनही मंत्री गायब झाले आहेत. त्यामुळे "मंत्री दाखवा व एक लाख रुपयांचे बक्षीस आपल्याकडून घेऊन जा,' अशी घोषणा भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केली आहे. 

राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्येप्रकरणी पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यासाठी कर्डिले पोलिस अधीक्षक कार्यालयात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री व तीनही मंत्र्यांवर टीका केली. 

पालकमंत्री कधी तरी जिल्ह्यात येतात. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख व नगरविकास राज्यमंत्री प्राजक्‍त तनपुरेही जिल्ह्यात फिरत नाहीत.

वास्तविक, त्यांनी प्रत्येक तालुक्‍यात जाऊन प्रशासनाच्या बैठका घेणे आवश्‍यक होते. त्यांना परिस्थितीचे गांभीर्य नाही. प्रशासनाच्या बैठका घेतल्या नाहीत. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले. त्यातून परिस्थिती गंभीर झाली आहे. 
पालकमंत्र्यांसह तिन्ही मंत्री दाखवा व आपल्याकडून एक लाखाचे बक्षीस घेऊन जा, अशी घोषणाच त्यांनी केली. 

हेही वाचा...

अशोक पवार, सतीश राजेभोसले जिल्हा बॅंकेचे कामगार संचालक 

नगर : जिल्हा सहकारी बॅंकेच्या कामगार संचालकपदी अशोक पवार व सतीश राजेभोसले यांची निवड करण्यात आली. बॅंकेच्या कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष धनंजय भंडारे यांनी या दोन नावांची शिफारस केली होती. 

संघटनेच्या पत्रावर संचालक मंडळाच्या सभेत चर्चा होऊन वरील नियुक्ती करण्यात आली. संबंधितांना नियुक्तीचे पत्र बॅंकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे यांच्या हस्ते देण्यात आले. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे उपस्थित होते. पवार यांनी यापूर्वी बॅंकेचे कामगार संचालक म्हणून काम पाहिले आहे. ते मुख्य कार्यालयात कार्यरत असून, क्रीडा क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. सतीश राजेभोसले शेवगाव तालुक्‍यातील राक्षी शाखेत कार्यरत आहेत. हे दोघेही अनेक वर्षांपासून संघटनेचे कार्यकर्ते आहेत. 

मनोगत व्यक्त करताना पवार व राजेभोसले म्हणाले, की संघटनेच्या माध्यमातून बॅंकेच्या कामगारांसाठी चांगले निर्णय घेऊ. संचालक मंडळ नेहमीच कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने सकारात्मक असते. त्यामुळे आगामी करार चांगल्या प्रकारे होईल, अशी अपेक्षा आहे. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख