शिर्डी साई संस्थान विश्वस्तांचा तिढा ! संघ निवडीसाठी पंधरा दिवस?

पात्रतेचे निकष पूर्ण झाले, तरच हे मंडळ टिकेल, अन्यथा नियुक्तीची घोषणा होताच निवडीला आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल होईल.
शिर्डी साई संस्थान विश्वस्तांचा तिढा ! संघ निवडीसाठी पंधरा दिवस?
saibaba.jpg

शिर्डी : साईसंस्थान (Saibaba Sansthan) विश्वस्त मंडळ नियुक्तीची अवस्था वेगवान गोलंदाजांचे एकतर्फी वर्चस्व असलेल्या क्रिकेट मॅच सारखी झालीय. फलंदाज मैदानात येण्यापूर्वी गोलंदाज विकेट घ्यायला सज्ज झाले आहेत. पात्रतेचे निकष पूर्ण न करताच फलंदाज मैदानात पाठविले, तर एकापाठोपाठ एक विकेट पडतात, हा पूर्वानुभव महाविकास आघाडी सरकारने लक्षात घेतला असावा. त्यामुळे खेळपट्टीवर टिकू शकणारा संघ निवडीसाठी पंधरा दिवसांची मुदत वाढवून घेतली असावी, असा कयास राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे. (Shirdi Sai Sansthan Trustees Fifteen days for team selection?)

पात्रतेचे निकष पूर्ण झाले, तरच हे मंडळ टिकेल, अन्यथा नियुक्तीची घोषणा होताच निवडीला आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल होईल. गमतीचा भाग असा की आज न्यायालयीन कामकाजात या संभाव्य याचिकेची शक्यता वर्तविण्यात आल्याचे सांगीतले जाते. नव्या मंडळात दहा वर्षांचा अनुभव असलेल्या आठ तज्ज्ञ सदस्य असायला हवेत. कालपासून सोशल मीडियात ज्या नावांची चर्चा आहे, त्यात हा निकष पूर्ण करणारे सदस्य हा आठचा आकडा पार करतील का, याबाबत शंका आहे. सात सदस्य पदवीधर आणि नगर जिल्ह्यातील हवेत, हा निकष तुलनेत सुलभ असला, तरी या सदस्यांवर नैतिक अधःपतन व फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल असता कामा नयेत, अशी अट आहे. या अटीकडे गांभीर्याने पाहिले नाही, तर काही सदस्यांची विकेट पडल्यात जमा असल्याचे बोलले जाते.

पूर्वीचे काँग्रेस आघाडी सरकार व त्यानंतरचे भाजप शिवसेना युतीचे सरकार यांनी नियुक्त केलेली तीन मंडळाने न्यायालयाच्या आदेशाने बरखास्त झाली. हे चौथे मंडळ नेमताना निकष व पात्रतेकडे दुर्लक्ष झाले, तर ये रे माझ्या मागल्या, अशी स्थिती निर्माण होईल. पुढील पंधरा दिवसांत खेळपट्टीवर टिकणारा संघ निवडण्याचे आव्हान महाविकास आघाडी सरकारपुढे आहे.

सोशल मीडियावरील यादी खरी?

साईसंस्थान अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार आशुतोष काळे यांची, तर उपाध्यक्षपदी शिवसेने माजी आमदार रवींद्र मिर्लेकर यांची निवड केली. या निवडी नक्की समजल्या जात आहेत. सोशल मीडियात फिरणाऱ्या विश्वस्त मंडळाच्या यादीबाबत मात्र संभ्रम कायम आहे.

हेही वाचा..

हेही वाचा..

हेही वाचा..

हेही वाचा..

हेही वाचा..

हेही वाचा..

हेही वाचा..

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in