बाळासाहेब थोरातांच्या लेकीने पडळकरांना करुन दिली संस्कारांची आठवण; म्हणाल्या…  - Sharu Deshmukh criticizes MLA Gopichand Padalkar | Politics Marathi News - Sarkarnama

बाळासाहेब थोरातांच्या लेकीने पडळकरांना करुन दिली संस्कारांची आठवण; म्हणाल्या… 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 30 जून 2021

पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की असे होते

नगर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या एका वक्तव्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर ओबीसी आरक्षण परत मिळवू देऊ शकलो नाही, तर राजकीय संन्यास घेऊ अशी घोषणा फडणवीस यांनी केल्यानंतर राज्याचे महसूल मंत्री व काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी स्वतंत्र विदर्भ होत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही, अशी घोषणा केल्याची आठवण त्यांना करुन दिली. यावरुन भाजप आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांनी टीका केली होती. त्या टीकेला थोरात यांच्या लेकीने उत्तर दिले आहे. (Sharu Deshmukh criticizes MLA Gopichand Padalkar)

हेही वाचा : फडणवीसांनी राजकीय संन्यास घ्यावाच; त्यामुळे मराठी माणसाचा जाच तरी संपेल

या संदर्भात थोरात यांच्या कन्या शरयू देशमुख यांनी ट्वीट केले. त्या म्हणाल्या की ''पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की असे होते. आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होते. असो, ज्याचे त्याचे संस्कार..!'' असा टोला त्यांनी पडळकरांना लगावला आहे. 

 
बाळासाहेब थोरात काय म्हणाले होते 

 

फडणवीसांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना थोरात म्हणाले होते की ''देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, स्वतंत्र विदर्भ होत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही. मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत धनगर आरक्षणाचा मुद्दा सोडवू. आता ओबीसी आरक्षण मिळवून दिले नाही, तर संन्यास घेईन म्हणतात. मात्र यापैकी काहीही झालेले नाही'', असे थोरात म्हणाले होते.

हेही वाचा : महाविकास आघाडीत मोठी घडामोड : शिवसेना आमदारांना व्हीप जारी....

गोपिचंद पडळकर काय म्हणाले होते.  

पडळकर यांनी ट्वीट करत म्हटले होते की, ''महसूलमंत्रीपदाच्या रस्सीखेचीमुळे काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा प्यायल्यामुळे बरळू लागले आहेत. मुळात देवेंद्रजी फडणवीसांचे लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्ष अगोदरच झाले आहे, याचंही भान यांना राहिले नाही'' असे पडळकर म्हणाले होते. 

Edited By - Amol Jaybhaye  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख