ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांची कोरोनावर मात - Senior leader Yashwantrao Gadakh defeats Corona | Politics Marathi News - Sarkarnama

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांची कोरोनावर मात

मुरलीधर कराळे
सोमवार, 19 जुलै 2021

गडाख यांचे पूत्र जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, युवा नेते प्रशांत गडाख यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यांनीही लवकर त्यावर मात करून सामाजिक कार्यात पुन्हा सक्रीय झाले.

नगर ः माजी खासदार तथा जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. काही दिवस रुग्णालयात ते उपचार घेत होते. वयाच्या 78 व्या वर्षी कोरोना झाल्यामुळे गडाख परिवार चिंतेत होता. 

दरम्यान, गडाख यांचे पूत्र जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, युवा नेते प्रशांत गडाख यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यांनीही लवकर त्यावर मात करून सामाजिक कार्यात पुन्हा सक्रीय झाले. यशवंतराव गडाख यांचा नुकताच वाचन करतानाचे छायाचित्र व्हायरल झाले आहे. त्यामुळे नेवासे तालुका, गडाख परिवारातून समाधान व्यक्त होत आहे.

हेही वाचा..

‘खावटी’मुळे थांबणार गरिबांची उपासमार

शेवगाव : कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने अनुसूचित जमातीतील कुटुंबांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजना पुन्हा सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून या कुटुंबांची उपासमार थांबणार आहे. तालुक्यातील लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांनी केले.

खावटी अनुदान योजनेतून अनुसूचित जमातीतील कुटुंबांना अन्नधान्य, किराणा साहित्य व रोख रकमेचे वाटप अध्यक्षा घुले व पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. तहसीलदार अर्चना भाकड-पागिरे, प्रभारी गटविकास अधिकारी शेखर शेलार, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनील बोरसे, सुरेश दुसंगे, शिवाजी नेमाणे, सरपंच उज्ज्वला मेरड, सरपंच प्रदीप काळे, संतोष धस, समीर शेख, शफीक शेख, शिवाजी नरके, अरुण सोनवणे, लक्ष्मण कुसळकर, गोवर्धन वाघ उपस्थित होते.

सभापती घुले म्हणाले, शासनाच्या योजना तळागाळातील पात्र लाभार्थीपर्यंत पोहचविण्याचे काम आम्ही करीत आहोत. मात्र तालुक्यात जातीपातीचे राजकारण सुरू असल्याने विकासात्मक राजकारणाला खीळ बसली असून, सर्वच आघाडीवर तालुक्याची पीछेहाट होत आहे. त्यामुळे आगामी काळात एकजुटीने जातीयवादी शक्तीचा बीमोड करण्याची गरज आहे.

या वेळी विविध योजनांतून ४८८ लाभार्थ्यांना अन्नधान्य व किराणा साहित्य व रोख दोन हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. सहायक गटविकास अधिकारी बाळासाहेब कासार यांनी विविध योजनांची माहिती दिली. प्रास्ताविक सहायक प्रकल्प अधिकारी सुनील बोरसे यांनी केले. सूत्रसंचालन आरोग्य विस्तार अधिकारी डॉ. सुरेश पाटेकर यांनी केले, सहायक समन्वयक सुधीर सांगळे यांनी आभार मानल

 

हेही वाचा..

विखे-लंके यांच्यात वाकयुद्धाचे कारण

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख