चार दिवसांतील दुसरी कारवाई ! भिमापात्रात सहा बोटींना जलसमाधी - Second action in four days! Six boats were sunk in Bhimapatra | Politics Marathi News - Sarkarnama

चार दिवसांतील दुसरी कारवाई ! भिमापात्रात सहा बोटींना जलसमाधी

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 31 मे 2021

विशेष म्हणजे चार दिवसातली ही या परिसरातील दुसरी कारवाई असल्याने वाळू तस्करांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

राशीन : खेड (ता.कर्जत) (Khed) येथील भीमा नदीपात्राच्या शिवशंभोनगर हद्दीत सुरू असलेल्या अवैध वाळु उपशावर तहसिलदार नानासाहेब आगळे यांच्या पथकाने अचानक कारवाई करत 2 फायबर 4 सेक्शन बोटींना जलसमाधी दिली आहे. (Second action in four days! Six boats were sunk in Bhimapatra)

विशेष म्हणजे चार दिवसातली ही या परिसरातील दुसरी कारवाई असल्याने वाळू तस्करांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

सध्या कर्जतच्या पोलीस आणि महसूल पथकाने सुरू केलेल्या या कारवाईचे नदी पट्ट्यातील गावांमधून स्वागत केले जात आहे. कोरोनाच्या संकटात सध्या कर्जतचे सर्वच प्रशासन विविध प्रश्न सोडवण्यासाठी व्यस्त आहे. मात्र याचाच फायदा घेत खेड परिसरातील वाळु तस्करांनी घेतला आहे. ही वाळु उपशाची यंत्रणा चालवण्यासाठी परप्रांतीयांचा मोठया प्रमाणावर वापर करण्यात येतो, असे असले तरी याचे कसलेही भान नसलेल्या वाळु तस्करांकडून गेली दिड महिन्यांपासून चोरट्या पद्धतीने वाळु उपसा सुरूच होता.मात्र तहसीलदार नानासाहेब आगळे यांना गुप्त बातमी मिळाली होती त्या अनुषंगाने प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार आगळे यांनी पथक तयार केले.कसलाही विलंब न करता या पथकाने थेट नदीपात्रात उतरून या बोटींना पाण्यात बुडवून जलसमाधी दिली आहे. 
यामध्ये वाळु तस्करांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.या कारवाईत तहसिलदार नानासाहेब आगळे यांच्यासह गावकामगार तलाठी धुळाजी केसकर, विश्वास राठोड,आनंद कोकाटे,साईनाथ थोरात व लोखंडे हे सहभागी झाले होते.

'त्या' वाळु तस्कराला नेमका आशिर्वाद कुणाचा?

चार दिवसांपुर्वीच कर्जत पोलिसांनी खेड-गणेशवाडी परिसरातील वाळुउपशावर कारवाई करून 24 लाखांचा मुद्देमाल नष्ट केला होता.पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी गुन्हेही दाखल केले होते. मात्र आज पुन्हा एकदा त्याच आरोपीची यंत्रणा कारवाईत सापडल्याने 'त्या' तस्कराला नेमका आशीर्वाद कुणाचा?अशी चर्चा रंगू लागली आहे.

मोक्का अंतर्गत कारवाई करा!

वाळु उपशात कारवाई झालेल्या काही वाळु तस्करांवर दौंड, कर्जत, करमाळा आदी ठिकाणी अनेक गुन्हे दाखल आहेत.आपली दहशत निर्माण करण्यासाठी वारंवार अनेक गुन्हेगारीच्या घटना घडवल्या जात आहेत.या गुन्हेगारांकडुन मोठे संघटनही निर्माण केले जात आहे.कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण(मोक्का)कायद्यांतर्गत कारवाई करण्याची गरज आहे.
 

हेही वाचा...

फुकट मिळेना, तर विकत लस घ्या

 

 

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख