सातव यांच्या निधनाने एक अभ्यासू मित्र गमावला ः आमदार विखे पाटील - Satav's death leaves a learned friend: MLA Vikhe Patil | Politics Marathi News - Sarkarnama

सातव यांच्या निधनाने एक अभ्यासू मित्र गमावला ः आमदार विखे पाटील

सरकारनामा ब्युरो
रविवार, 16 मे 2021

मागील काही दिवसांपासून राजीव सातव कोव्हीड संकटाचा सामना करीत होते. यातून लवकर बरे होवून पुन्हा सक्रीय होतील, आशी अपेक्षा होती.

शिर्डी : खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या निधनान राजकीय क्षेत्रातील एक अभ्यासू आणि धडाडीने काम करणारा मित्र आपण गमावला. मागील काही दिवसांपासून राजीव सातव कोव्हीड संकटाचा सामना करीत होते. यातून लवकर बरे होवून पुन्हा सक्रीय होतील, आशी अपेक्षा होती. परंतू नव्या संसर्गा विरोधातील त्यांची झुंज अपयशी ठरली, अशा शब्दांत आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी (कै.) सातव यांना श्रद्धांजली वाहिली. (Satav's death leaves a learned friend: MLA Vikhe Patil)

 

हेही वाचा...

खटला अन्य न्यायाधीशांपुढे चालवा 
 

पारनेर : राज्य सहकारी बॅंक गैरव्यवहार प्रकरणाचे मुख्य तक्रारदार सुरिंदर अरोरा यांनी न्यायालयासमोर अचानक आपली भूमिका बदलली आहे.

पोलिसांनीही गुन्ह्यातील तपासाची मूळ कागदपत्रे न्यायालयासमोर न आणण्याची भूमिका घेतली आहे. तसेच या गुन्ह्याचा निकाल देण्यासाठी न्यायालयानेही घाई केली आहे, असे सांगत या प्रकरणातील तक्रारदार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, माणिक जाधव, शालिनी पाटील, बबन कवाद यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. तसेच हा खटला दुसऱ्या न्यायाधीशापुढे चालवावा, असे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यावर 19 मे रोजी मुंबई येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. 

राज्य सहकारी बॅंकेने बेकायदेशीर कर्जवाटप केल्यामुळे सुमारे पंचवीस हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. संचालक मंडळाची गुन्हा रद्द करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत तपासाला सामोरे जा, असे सांगितले होते. पुढे आर्थिक गुन्हे विभागाने गुन्ह्याचा तपास करून आरोपपत्र न्यायालयासमोर दाखल केले. परंतु आरोपपत्रात संचालकांचा दोष नाही, असे सांगून गुन्ह्याचा तपास बंद (सी समरी रिपोर्ट) करण्याची मागणी न्यायालयाकडे पोलिसांनी केली होती. त्यावेळी पोलिसांनी महत्त्वाची कागदपत्रेही दिली नाहीत. त्यास तक्रारारदारांच्या वकिलांनी विरोध केला. 

पुढे मूळ तक्रारदार अरोरा यांनी अचानक आपली भूमिका बदलून तपासावर समाधानी आहे. मी माझे काम पाहणाऱ्या वकिलांना कार्यमुक्त केल्याचे पत्र तीन मे रोजी न्यायालयाला दिले. मूळ तक्रारदाराच्या या भूमिकेमुळे लगेचच न्यायालयानेही तत्काळ निकाल देण्याची भूमिका घेतली. 

हेही वाचा..

मोकाट फिरणाऱ्यांची अॅंटिजन चाचणी

या प्रकरणात मंत्रिमंडळातील अनेकांची नावे आहेत. त्यामुळेच आर्थिक गुन्हे शाखेने नेत्यांना वाचविणारा अहवाल तयार केल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. तर हजारे यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तक्रारदारांच्या बाजूने ऍड. सतीश तळेकर बाजू मांडत आहेत. 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख