संगमनेर रुग्णसंख्येत अव्वल, जिल्ह्याची रुग्णसंख्या झपाट्याने घटतेय

इतर तालुक्यांच्या तुलनेत संगमनेरमध्ये सध्या सर्वात जास्त रुग्ण आढळून येत आहेत.
Antijan test.jpg
Antijan test.jpg

नगर : जिल्ह्यात कोरोना (Corona) रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने घटत होत आहे. मागील 15 दिवसांपूर्वी रोज चार हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळत होते. ते प्रमाण आता दोन हजारांच्या आत आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत संगमनेरमध्ये सध्या सर्वात जास्त रुग्ण आढळून येत आहेत. (Sangamner tops in patient population, district's patient population is declining rapidly)

जिल्ह्यात काल २ हजार ७९९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ३० हजार ४०३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.७१ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, काल जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १ हजार ८५१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १५ हजार २८४ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३७०, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४९३ आणि अँटीजेन चाचणीत ९८८ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३, अकोले ७६, जामखेड ५, कर्जत २५, कोपरगाव २४, नगर ग्रामीण ४९, नेवासे ११, पारनेर ४, पाथर्डी ४८, राहता १२, राहुरी ३, संगमनेर ६२, श्रीगोंदा १९, श्रीरामपूर ६, कॅंटोन्मेंट ६, मिलिटरी हॉस्पिटल १ आणि इतर जिल्हा १० अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ९२, अकोले २२, जामखेड १, कर्जत १, कोपरगाव १६, नगर ग्रामिण ५६, नेवासे ३७, पारनेर ३२, पाथर्डी १४, राहाता ४२, राहुरी ४९, संगमनेर ६०, शेवगाव ५, श्रीगोंदा १६, श्रीरामपूर ३७, कॅंटोन्मेंट बोर्ड ४ आणि इतर जिल्हा ९ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ९८८ जण बाधित आढळून आले. मनपा ३१, अकोले ७, जामखेड २९, कर्जत ५९, कोपरगाव ८२, नगर ग्रामिण ६८, नेवासा ६३, पारनेर १४५, पाथर्डी ६५, राहाता ३७, राहुरी ५९, संगमनेर ९८, शेवगाव ३८, श्रीगोंदा १०७, श्रीरामपूर ४७, कॅंटोन्मेंट १ आणि इतर जिल्हा २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये

मनपा १४५, अकोले १६४, जामखेड १४१, कर्जत २०८,  कोपरगाव १५२, नगर ग्रामीण २५४, नेवासा १८७, पारनेर १५८, पाथर्डी १६१, राहाता १६१, राहुरी १७२, संगमनेर ३०८,  शेवगाव १८१,  श्रीगोंदा १८७,  श्रीरामपूर १६३, कॅन्टोन्मेंट १०, इतर जिल्हा ४६ आणि इतर राज्य १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात बरे झालेली रुग्ण संख्या - २,३०,४०३

उपचार सुरू असलेले रूग्ण - १५२८४

आतापर्यंत एकूण मृत्यू - २८२९

एकूण रूग्ण संख्या - २,४८,५१६

ता. 23 रोजी नव्याने आढळले रुग्ण ः

संगमनेर - 220

पारनेर 181

नगर तालुका 173 

अकोले 155

श्रीगोंदे 142

नगर शहर 132

पाथर्डी 127

कोपरगाव 122

नेवासे 111

राहुरी 111

राहाता 91

श्रीरामपूर 90

कर्जत 85

शेवगाव 43

जामखेड 35

इतर जिल्ह्यातून आलेले 21

भिंगार 11

मिलिट्री हाॅस्पिटल 1

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com