संभाजी राजेंची भूमिका मराठा समाजाच्या हिताची, पण नवीन पक्षाबाबत काय : विखे पाटील

सर्व संघटनांनी एकत्र येऊन राज्य सरकारवर दबाव आणावा लागेल. महाविकास आघाडी सरकार याप्रश्‍नी सपशेल अपयशी ठरले.
radhakrushna vikhe.jpg
radhakrushna vikhe.jpg

शिर्डी : खासदार छत्रपती संभाजी राजे (Sambhaji Raje) यांची भूमिका मराठा समाजाच्या हिताची आहे. मात्र, नवीन पक्ष काढण्याच्या संदर्भात त्यांनी सूतोवाच केले असले, तरी आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाने कोणत्याही पक्षाच्या बाजूने आपली भूमिका व्यक्त केलेली नाही. सर्व संघटनांनी एकत्र येऊन राज्य सरकारवर दबाव आणावा लागेल. महाविकास आघाडी सरकार याप्रश्‍नी सपशेल अपयशी ठरले. केंद्राकडे बोट दाखवून राज्यातील सत्ताधारी आपले अपयश झाकू पाहत आहेत, असे मत आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. (Sambhaji Raje's role is in the interest of the Maratha community, but what about the new party: Vikhe Patil)

जिल्हाभर सेवा सप्ताह

विखे पाटील म्हणाले, "कोविड संकटाच्या काळात जगातील प्रगत देशांतही आरोग्य व्यवस्थेवर ताण आला होता. मर्यादित साधनसामग्री असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व लाखो कोविडयोद्‌ध्यांनी कोविड लाटांचा यशस्वी मुकाबला केला. पंतप्रधान मोदी यांच्या कूटनीतीमुळेच कोविड संकटकाळात अनेक देशांनी भारताला मदतीचा हात दिला. त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सात वर्षे पूर्ण झाली. त्याबद्दल उद्यापासून (रविवार) जिल्हाभर सेवा सप्ताहाचे आयोजन केले जाईल,'' अशी माहिती आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. 

आमदार विखे म्हणाले, ""या सप्ताहाच्या निमित्ताने गावपातळीवर "सेवा ही संघटन' हा विचार घेऊन सेवाभावी उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्यात कोविडयोद्‌ध्यांचा सन्मान, आरोग्यविषयक उपक्रम, रेशन किट, तसेच म्युकरमायकोसिस रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मदत मिळवून दिली जाईल. आरोग्य, महसूल, पोलिस कर्मचारी, सेवाभावी वृत्तीने काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही सन्मान केला जाईल. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या आवाहनानुसार हे अभियान राबविले जाणार आहे.'' 

हेही वाचा..

पारनेरमध्ये लहान मुलांवर मोफत उपचार होणार 

पारनेर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांचा बचाव करण्यासाठी डॉ. श्रीकांत पठारे यांनी पारनेरमध्ये 50 बेडचे ऑक्‍सिजनयुक्त डेडिकेटेड कोविड सेंटरच्या उभारणीस सुरवात केली आहे. हे सेंटर ग्रामीण रुग्णालयाच्या मदतीने उभारण्यात येत आहे. 

कोरोनावरील उपचार करण्यासाठी लहान मुलांसाठी उभारण्यात येत असलेल्या या सेंटरची उभारणी बालरोग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. लहान मुलांसाठी मोफत उपचार होणार आहे. पारनेरमधील डेडिकेटेड कोविड सेंटर हे राज्यातील पाहिले मोफत उपचार करणारे सेंटर ठरले आहे. 

डॉ. पठारे हे सध्या पूर्णवाद भवन येथे ग्रामीण रुग्णालयाच्या मदतीने डेडिकेटेड कोविड सेंटर चालवत आहेत. खासगी डॉक्‍टर कोविड सेंटर उभारून रुग्णांना मोफत सेवा देणारे राज्यातील एकमेव डॉक्‍टर म्हणून डॉ. पठारे यांचा सन्मान महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व खासदार सुजय विखे यांनी यापूर्वीच केला होता. तालुक्‍यात सुरू होत असलेले डॉ. पठारे संचालित बालरोग विभाग डेडिकेटेड कोविड सेंटरला पारनेर पंचायत समिती सभापती गणेश शेळके यांच्याकडून 30 बेड व 50 ब्रास फरशी भेट देण्यात आली आहे. 
भविष्यात येऊ घातलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांचा बचाव करण्यासाठी डॉ. पठारे यांनी अगोदरच पाऊल उचलून एक वेगळा संदेश दिला आहे. 
डॉ. पठारे यांनी सुरू केलेल्या कोविड सेंटरला मदतीसाठी तालुक्‍यातून मोठ्या प्रमाणात मदतीचे हात पुढे येत आहेत. त्यांच्या या सामाजिक कामाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com