केंद्र सरकारच्या धमक्यांमुळेच महाराष्ट्राला लस नाही! - Rural Development Minister Hasan Mushrif criticizes the central government | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

केंद्र सरकारच्या धमक्यांमुळेच महाराष्ट्राला लस नाही!

 सचिन आगरवाल  
सोमवार, 7 जून 2021

लसीकरणाची जबाबदारी राज्यावर न टाकता केंद्र सरकारनेच स्वीकारावी. 

नगर : केंद्र सरकार सीरम इन्स्टिट्यूटला धमकी देत असल्यामुळेच महाराष्ट्राला लसीचे दीड कोटी डोस उपलब्ध करून दिल्या नाहीत. खासगी कंपन्याही राज्याला लस विक्रीसाठी व्यवहार करण्यास तयार नाहीत, असा आरोप राज्याचे ग्रामविकास मंत्री व नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी रविवारी नगरमध्ये केला.  (Rural Development Minister Hasan Mushrif criticizes the central government)

मुश्रीफ म्हणाले की ''त्यामुळे लसीकरणाची जबाबदारी राज्यावर न टाकता केंद्र सरकारनेच स्वीकारावी व लसीकरण करून महाराष्ट्राला भयमुक्त करावे, असे आवाहन देखील त्यांनी केंद्र सरकारला केले. 

हे ही वाचा : 380 कोटींच्या श्रीखंडा साठी नाशिकला भाजप-शिवसेना युती?

दरम्यान, रविवारी जालन्यामध्ये बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते की ''लसींची उपलब्धता नसल्याने 18 ते 44 वयोगटातील नागरीकांना राज्यात लसीकरण बंद आहे. राज्यातील लसीकरणाला वेग मिळावा, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व वयोगटातील नागरिकांना लस मिळावी, असे सरकारचे प्रयत्न होते. त्यासाठी जागतिक निविदा देखील काढण्यात आल्या. मात्र, त्यामध्ये अनेक अडचणी आहेत, त्यामुळे विदेशातून लस मिळणे शक्यता कमी असल्याचे टोपे यांनी सांगितले होते. 

देशातील कोरोना  (Covid-19) संसर्ग रोखण्यासाठी सरकारने कोरोना लसीकरणावर (Covid Vaccination) भर दिला आहे. लशीची टंचाई निर्माण झाल्याने या मोहिमेला ब्रेक लागला आहे. असे असतानाही जगात कोरोना लसीकरणात भारताचा (India) तिसरा क्रमांक असल्याचा दावा केंद्रीय गृह राज्यमंत्री जी.किशन रेड्डी यांनी केला आहे. 

हे ही वाचा : खबरदार, कुठेही गर्दी, नियम मोडलेले चालणार नाही; मुख्यमंत्र्यांच्या स्पष्ट सूचना...

देशात आतापर्यंत 21 कोटी 85 लाख नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे, असे सांगून रेड्डी म्हणाले की, जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतातील लसीकरण मोहीम व्यापक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांना लस देणारा भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लसीकरण मोहिमेला गती मिळाली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत सर्वांना लस देण्याचे उद्दिष्ट्य सरकारने ठरवले आहे. 

सरकारने 250 कोटी डोसचे उत्पादन करण्यासाठी कृती आराखडा आखला आहे. याचबरोबर सरकार लस आयात करत आहे. देशात लशीची सर्वाधिक आयात 1 जूनला झाली. काल देशाला 56.6 टन रशियाच्या स्पुटनिक व्ही लस मिळाली. फायजर आणि जॉन्सन अँड जॉन्सनकडून लस मिळवण्याबाबतही चर्चा सुरू आहे.  पुढील सात ते आठ महिन्यांत सर्वांचेच लसीकरण झालेले असेल, असे रेड्डी यांनी सांगितले होते. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख