रोहित पवारांचे समर्थक डॉ. विखेंच्या दिमतीला !  - Rohit Pawar's supporter Dr. Vikhen's Dimti! | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

रोहित पवारांचे समर्थक डॉ. विखेंच्या दिमतीला ! 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 27 एप्रिल 2021

विशेष म्हणजे कानगुडे व राजेभोसले हे रोहित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. मात्र, ही मंडळी भाजप खासदारांच्या दिमतीला पाहून अनेक जण अचंबित झाले.

राशीन : भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सोमवारच्या (ता. 26) दौऱ्यात त्यांच्या दिमतीला चक्क राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते दिसले. त्यामुळे राजकीय गोटात नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

खासदार डॉ. विखे पाटील राशीन येथील कोविड सेंटरची पाहणी करण्यासाठी आले असताना, पंचायत समितीच्या माजी सभापती अश्‍विनी कानगुडे यांचे पती युवक नेते श्‍याम कानगुडे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस शहाजी राजेभोसले हे विशेष करून त्यांच्या दिमतीला होते. 

विशेष म्हणजे कानगुडे व राजेभोसले हे रोहित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. मात्र, ही मंडळी भाजप खासदारांच्या दिमतीला पाहून अनेक जण अचंबित झाले. कोविड सेंटरची पाहणी करून झाल्यावर राजेभोसले यांच्या कार्यालयात खासदार विखे पाटील यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी राजकीय गप्पांची मैफीलही रंगली. कोरोनाच्या सद्यःस्थितीवर चर्चा झाली, तसेच चहापानाने बैठकीची सांगता झाली. या बैठकीला दत्ता गोसावी, एकनाथ धोंडे, पांडुरंग भंडारे, सोयब काझी, भीमराव साळवे, उमेश शेटे, प्रसाद मैड आदी उपस्थित होते. 

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते कोणत्याही राजकीय विषयांवर सोशल मीडियाद्वारे एकमेकांवर तुटून पडताना दिसतात. सुरवातीच्या काळात आमदार रोहित पवार यांना गळ्यातील ताईत मानणारे कार्यकर्ते आणि पदाधिकारी भाजप खासदारांच्या दिमतीला आलेले पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

 

हेही वाचा...

पथसंचलनात पोलिसांकडून जनजागृती 

नेवासे : कोरोना महामारीचा वाढता उद्रेक व त्यावर उपाय म्हणून घातलेल्या निर्बंधांच्या काटेकोर अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर नेवासे पोलिसांनी मंगळवारी (ता. 27) शहरासह नेवासे फाटा परिसरात पथसंचलन केले. 

प्रांताधिकारी गणेश पवार, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, पोलिस निरीक्षक विजय करे यांच्या नेतृत्वाखाली पथसंचलनात सहायक पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूर, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, भरत दाते यांच्यासह नेवासे पोलिस सहभागी झाले होते. 

पथसंचलनास नेवासे पोलिस ठाण्यापासून प्रारंभ झाला. शहरातील विविध चौक, प्रभाग, नेवासे बसस्थानक, नेवासे फाटा भागात पथसंचलनादरम्यान नागरिकांना कोरोना काळात स्वतःची काळजी घेणे, मास्क वापरणे, तसेच अत्यावश्‍यक कामाशिवाय बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात येऊन, जनजागृती करण्यात आली. नेवासे फाटा येथे संचलनाचा समारोप झाला. 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख