महसूलमंत्री थोरात यांनी संगमनेरसाठी मंजूर केले पाच कोटी

मागील दोन वर्षांपासून राज्यातील कोवीडच्या संकटातही थोरात यांनी विकास कामांना प्राधान्य देत, त्यासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे.
balasaheb thorat 1.jpg
balasaheb thorat 1.jpg

संगमनेर : काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य, विधिमंडळ गटनेते व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्याची विकासाची घोडदौड सुरु आहे. त्यांच्या पाठपुराव्यातून तालुक्यातील रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकऱणासह इतर कामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली आहे. (Revenue Minister Thorat sanctioned Rs 5 crore in Sangamner)

मागील दोन वर्षांपासून राज्यातील कोवीडच्या संकटातही थोरात यांनी विकास कामांना प्राधान्य देत, त्यासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. 2515 योजनेंतर्गत 2020 - 21 या आर्थिक वर्षासाठी लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी उपलब्ध झालेल्या पाच कोटी रुपयांच्या निधीतून, तालुक्यातील चिंचोली गुरव, वडझरी खुर्द, तळेगाव दिघे, पळसखेडे, कऱ्हे, तिगाव, माळेगाव हवेली, मालुंजे, धांदरफळ बुद्रुक, वेल्हाळे, जाखुरी, पिंपरणे, राजापूर, पिंपळगाव कोंझिरा, वडगाव लांडगा, मेंढवण, हिवरगाव पावसा, नान्नज दुमाला, निमज, वडगाव पान, डोळासणे, पिंपळे, कासारा दुमाला, पानोडी, मालदाड, पिंपरणे, निळवंडे, निमगाव बुद्रुक, कवठे मलकापूर या गावांमधील रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे.

निमगाव टेंभी, आश्वी बुद्रूक व निमगाव बुद्रूक येथील स्मशानभूमी सुशोभिकरण, खरशिंदे येथील कब्रस्तान व अंभोरे येथील दशक्रियाविधी घाट बांधणे व सुशोभीकरण, पारेगाव खुर्द येथील ग्रामपंचायत कार्यालय, जवळेकडलग येथील हनुमान मंदिर संरक्षण भिंत आदी कामांचा समावेश आहे.

नव्याने होणाऱ्या या कामांमुळे मजबूत रस्त्यांचे जाळे निर्माण होणार असल्याने, तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दळणवळणाची चांगली सुविधा निर्माण होणार आहे.
 

हेही वाचा..

बालपणच्या विद्यार्थ्यांनी दिला चित्रातून वाघ वाचवण्याचा संदेश

संगमनेर : निसर्गाच्या अन्नसाखळीतील महत्वाचा दुवा असलेला, आपल्या देशाचा राष्ट्रीय प्राणी असलेल्या देखण्या वाघांची संख्या मानवी चुक व लहरी निसर्गाच्या तडाख्याने कमी होत आहे. हा प्राणी वाचवण्याची मोहिम शासन व वन्यजीवप्रेमींनी हाती घेतली आहे.

आजच्या जागतिक व्याघ्रदिनाच्या निमित्ताने तालुक्यातील पानोडी येथील बालपण स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून वाघांचे संरक्षण व संवर्धन करण्याचा संदेश देताना, या कामात सहभाग नोंदवला आहे.

या उपक्रमात सहभागी होत पानोडी येथील बालपण विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वाघ वाचवा या संकल्पनेवर आधारीत चित्र व घोषवाक्ये तयार केली आहेत. ऑनलाईन प्रक्रियेतून साकारलेली चित्रे संकलीत करुन संस्थेच्या प्रमुख सोनाली मुंढे यांनी समाजमाध्यमावर प्रदर्शित केली आहेत.
 

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com