कोरोना कमी करण्यासाठी हा उपाय ! प्रशासनाने तालुके ‘लॉक’ करावेत

मागील दीड महिन्यात आम्ही ५० हजारांपेक्षा जास्त रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मोफत अन्नपुरवठा केला. त्यामुळे गैरसोय टळली. तिसऱ्या लाटेशी सामना करताना सर्व यंत्रणा सज्ज आहेत.
Antijan test.jpg
Antijan test.jpg

नगर : कोरोनाची पहिली लाट आली, त्या वेळी कोणतीही तयारी नव्हती. रुग्णालयात कर्मचारी काम करण्यास तयार होत नव्हते. त्यामुळे अनेक अडचणी आल्या. दुसऱ्या लाटेत मात्र ही स्थिती नव्हती. यंत्रणा सज्ज होती. आता कोरोनामुक्तीसाठी तालुके लाॅक करावेत. तालुक्यांतील कोरोना कमी झाल्यास शहरातीलही कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आमदार संग्राम जगताप यांनी `सरकारनामा`शी बोलताना व्यक्त केली. (This remedy to reduce corona! The administration should 'lock' the talukas)

ते म्हणाले, की विशेष म्हणजे जिल्ह्यातील सामाजिक संघटनांनी चांगला हातभार लावल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मदत मिळाली. मागील दीड महिन्यात आम्ही ५० हजारांपेक्षा जास्त रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मोफत अन्नपुरवठा केला. त्यामुळे गैरसोय टळली. तिसऱ्या लाटेशी सामना करताना सर्व यंत्रणा सज्ज आहेत. पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध होण्यासाठी नियोजन केले आहे. शहरात कोरोना वाढू नये, यासाठी प्रशासनाने तालुके ‘लॉक’ करण्याची गरज आहे.

कोरोनाचे साडेपाचशे रुग्ण वाढले

कोरोनाचे जिल्ह्यात दिवसभरात ५६७ रुग्ण वाढले असून, त्यात संगमनेर तालुक्‍यातील सर्वाधिक रुग्णांचा समावेश आहे. संगमनेरमध्ये १०८ रुग्ण आढळून आले. जामखेड तालुका दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे लॉकडाउनची भीती व्यवसायकांमध्ये निर्माण झाली आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर काही बेफिकीर नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करण्यास सुरवात केली. मास्कचा वापर न करणे, सोशल डिस्टसिंगचे पालन न करणे आणि सॅनिटायझर न वापरणे, यातूनच कोरोनाचा संसर्ग वाढण्यास सुरवात झाली आहे. संगमनेर तालुक्‍यात पुन्हा रुग्णसंख्येचा उद्रेक सुरू झाला आहे. संगमनेर तालुका हा कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही रुग्णसंख्येमध्ये आघाडीवर राहिला आहे. आता रुग्णसंख्येत तो पुन्हा आघाडीवर आला आहे. तेथील रुग्णांनी शंभरी ओलांडली आहे.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या दोन लाख ८९ हजार ८२० झाली आहे. सहा हजार ६८ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. दिवसभरात कोरोनातून बरे झालेल्या ६१० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत दोन लाख ८० हजार २६४ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या तीन हजार ४८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
तालुकानिहाय रुग्ण याप्रमाणे ः संगमनेर १०८, जामखेड ८८, पारनेर ७७, कर्जत व पाथर्डी प्रत्येकी ४७, शेवगाव ३०, श्रीगोंदे व नगर तालुका प्रत्येकी २५, नेवासे २४, कोपरगाव २०, श्रीरामपूर १८, राहाता व राहुरी प्रत्येकी १६, अकोले १३ आणि नगर शहर सात. परजिल्ह्यांतील सहा रुग्णांचाही यामध्ये समावेश आहे.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com