आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून कर्जत-जामखेडसाठी 300 `रेमडेसिविर` - 'Remedisivir' for Karjat-Jamkhed through the initiative of MLA Rohit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.

आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून कर्जत-जामखेडसाठी 300 `रेमडेसिविर`

नीलेश दिवटे
सोमवार, 12 एप्रिल 2021

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या माध्यमातून आता पुणे, नगर, बीड, सोलापूर आणि कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी तुटवडा असलेल्या 300 रेमडेसिविर इंजेक्शनची उपलब्धता करण्यात आली आहे.

कर्जत : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यशासन हादरले आहे. जिल्ह्यात आणि तालुक्यातही रुग्णांची वाढती संख्या विचार करायला लावणारी आहे. ही वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी आमदार.रोहित पवार पुन्हा एकदा सरसावले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या माध्यमातून आता पुणे, नगर, बीड, सोलापूर आणि कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी तुटवडा असलेल्या 300 रेमडेसिविर इंजेक्शनची उपलब्धता करण्यात आली आहे.

काल आमदार रोहित पवार यांनी तालुक्यातील गायकरवाडी येथे भेट देत प्रगतीपथावर असलेल्या 350 बेडच्या कोव्हिडं सेंटरची पाहणी केली. तसेच याबाबत मार्गदर्शक सूचना केल्या. या वेळी राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे, शहराध्यक्ष सुनील शेलार, युवकचे प्रा. विशाल म्हेत्रे, महिला आघाडीच्या डॉ. शबनम शेख, भास्कर भैलूमे, राहुल नवले, तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड आदी उपस्थित होते.

नगर येथील कोरोनाचा वाढता आकडा पाहता तेथील कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य यंत्रणेला आपल्या सुरक्षिततेसाठी जिल्हा रुग्णालयास 5000 एन-95 मास्क, तर कर्जत-जामखेडसाठी 5000 एन-95 मास्क पाठवण्यात आले आहेत. तसेच कोरोना रुग्णांसाठी लागणारे पन्नास ऑक्सिजन सिलिंडर कर्जत जामखेड मतदारसंघासाठी दिलेले असून, त्यात कर्जत व जामखेड साठी प्रत्येकीसाठी 25 आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आले आहेत.

कर्जत तालुक्यातील रुग्णांचा झपाट्याने वाढत असलेला आकडा कमी करण्यासाठी आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून पुणे, मुंबई शहरांच्या धरतीवर रुग्णांसाठी 350 अद्ययावत बेडची व्यवस्था कर्जत जवळील गायकरवाडी येथे करण्यात येत असून, जामखेड येथेही 300 बेडचे कोरोना सेंटर व्यक्तिगत स्वरूपातून उभा करण्यात येत आहे. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

स्वतः रक्तदान करत केले रक्तदानाचे आवाहन!

राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताअभावी कुणालाही आपला जीव गमावू लागू नये, यासाठी राज्यातील युवांनी पुढाकार घेऊन प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून रक्तदान करावे, असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी सोशल मिडियावर केले आहे. स्वतः रक्तदान करत त्यांनी दिलेला हा संदेश युवकांना प्रेरित करणारा आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख