डोंगर पोखरून निघाला उंदिर ! 10 गावांत 100 पोलिसांचे छापे, सापडले 2 आरोपी

नगर-औरंगाबाद रस्त्यावरील शनी चौकाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. बुधवारी रात्री सुरु झालेली मोहीम गुरुवारी दुपारी दोन वाजता संपली.
Police.jpg
Police.jpg

सोनई : जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने चार वरिष्ठ अधिकारी, अठरा अधिकारी व शंभरहून अधिक पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ५२ जणांच्या झाडाझडती साठी शनिशिंगणापुर आणि सोनई पोलिस ठाणे हद्दीतील दहा गावांना विळखा घातला. ही कारवाई म्हणजे डोंगर पोखरुन उंदिर निघावा, अशीच झाली आहे. (The rat went out of the mountain pond! 100 police raids in 10 villages, 2 accused found)

मागील दोन महिन्यात सोनई व शनिशिंगणापुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चांदे गावात ज्ञानदेव दहातोंडे यांचा खुन झाला होता. ब-हाणपुर ग्रामपंचायत सदस्य संकेत चव्हाणवर खुनी हल्ला, तर सोनई व हनुमानवाडीत युवकावर हल्ला झाला होता. या घटनेने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. गावठी पिस्तूलाचा वापर करत सुरु असलेल्या धंद्यावर 'सकाळ'ने वेळोवेळी पाठपुरावा करत बाजू लावून धरली होती.

जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांनी सोनई हद्दीतील ४३ तर शिंगणापुर हद्दीतील ९ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांची झाडाझडती म्हणून विशेष मोहीमचा आराखडा तयार केला.बुधवार (ता. २८)च्या मध्यरात्री दोन वाजता सर्व नियोजन झाले. तीन वाजता अप्पर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, डाॅ. दीपाली काळे, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके व सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एकोणीस अधिकारी व ९० पोलिस कर्मचा-यांनी दहा गावांना वेढा घालत मोहीम राबवली.

नगर-औरंगाबाद रस्त्यावरील शनी चौकाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. बुधवारी रात्री सुरु झालेली मोहीम गुरुवारी दुपारी दोन वाजता संपली. या कारवाईत शहारुख उर्फ चाट्या जावेद शेख (रा. घोडेगाव) यास गावठी पिस्तूलासह अटक केली. करण बाळासाहेब भंडालकर (घोडेगाव) यास एका तलवारीसह अटक केली आहे. पन्नास जणांच्या घराची झडती घेतली असता कुठलेही हत्यार सापडले नाही, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी दिली.

'पोखरला डोंगर सापडला उंदिर' ही मराठी म्हण प्रसिद्ध आहे. अगदी याप्रमाणेच दहा गावात पोलिसांचा मोठा लवाजमा दाखल होवून संपुर्ण परीसरात रात्रभर धावपळ, बंदोबस्त,गनिमी कावा आणि आडवाटेला झालेली वाहनांची कसरत झाली, मात्र या मोहिमेत अवघे दोन आरोपी अटक झाले आहेत.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com