राधाकृष्णजी...तर मी तुमच्यावर रागावलो असतो : उद्धव ठाकरे  - Radhakrishnaji ... then I would be angry with you: Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

राधाकृष्णजी...तर मी तुमच्यावर रागावलो असतो : उद्धव ठाकरे 

मुरलीधर कराळे
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कोंडलेला हिरा बाहेर काढत कोंदणात बसविला.

नगर : राधाकृष्णजी, मी तुम्हाला धन्यवाद देतो. जर तुम्ही मला या कार्यक्रमाला बोलावलं नसतं, तर मी आपल्यावर नक्कीच रागावलो असतो. पण, तुम्ही मला कार्यक्रमाला बोलावलं. जुन्या आठवणींना एक उजाळा दिला. पक्षभेद बाजूला ठेवून विखे आणि ठाकरे घराण्याचे ऋणानुबंध असेच जपत पुढे जाऊ. चांगल्या गोष्टी एकत्र येऊन नक्की पूर्ण करू, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विखे आणि ठाकरे घराण्याच्या ऋणानुबंधांना उजाळा दिला. 

दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राच्या पुस्तकाचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (ता. 13 ऑक्‍टोबर) लोणी (जि. नगर) येथे झाले. त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. 

नगरचे विखे पाटील घराणे तसे कॉंग्रेसचे, इंदिरानिष्ठ. परंतु (स्व.) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कोंडलेला हिरा बाहेर काढत कोंदणात बसविला. बाळासाहेब विखे पाटील यांना केंद्रात मंत्री केले, अशीही आठवण ठाकरे यांनी या वेळी सांगितली. 

ते म्हणाले की, बाळासाहेब विखे पाटील यांच्याबाबतची एक आठवण आहे. एक कार्यक्रम होता, त्याला आम्ही उपस्थित होतो. कार्यक्रमानंतर आम्ही बोलत होतो. तेवढ्यात बाळासाहेब व्यासपीठावरून उतरून गर्दीतून आले. आमच्याजवळ येऊन ते म्हणाले, मी बाळासाहेब विखे पाटील. त्या वेळी आम्ही सर्वजण आवाक झाले. कारण, त्यांना सर्वजण ओळखत होतं. पण, त्यांच्या विनयशील स्वभावामुळे आमची ती प्रतिक्रिया होती. 

विखे घराणे जिद्दीने पुढे आले आहे. परिस्थितीचा सामना सर्वजण करत असतात. पण, या घराण्याने परिस्थिती बदवली. कोणत्या कारणांसाठी आपण देह वेचतो आहोत, ते पाहिल्यानंतर बाळासाहेबांचे व्यक्तीमत्त्व किती उत्तुंग होते, हे दिसून येते, असे सांगून ठाकरे म्हणाले की सरकारी कामात साचेबद्ध उत्तर मिळते, परंतु असे का, याचे उत्तर बाळासाहेबांनी शोधले. ओढ्यावरचा पूल बांधायचाय. तेही बाळासाहेब बारकाईने पाहत. त्यात काही बदल सुचवायचे. अधिकारी सांगायचे त्यात खर्च वाढेल. परंतु बदल केला नाही, तर त्याचा उपयोग काय. पाणी तर साचलं पाहिजे. असे म्हणून ते बदल करण्यास भाग पाडत. 

ठाकरे म्हणाले, "सहकार चळवळ कशी उभारली, हे ते वडिलांकडून शिकले. भुताच्या माळावर नंदनवन कसे फुलवले, या सर्व अशक्‍यप्राय करणाऱ्या गोष्टी आहेत. शेतकऱ्यांची जी संस्था असते, ती जपली पाहिजे. ते काचेचे भांडे आहे. खरा मालक समाज आहे. आपण केवळ विश्वस्त आहोत, हे ते वारंवार सांगत. सभासदांच्या हिताला बाधा येईल, असा कोणताही निर्णय ते घेत नसत. अत्यंत चौकसपणे ते निर्णय घेत.' 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख