राधाकृष्ण विखेंच्या वक्तव्याला थोरातांच्या लेखी `नो व्हॅल्यू`

विखे यांनी जिल्ह्यातील पालकमंत्र्यांसह चार मंत्र्यांचे दुर्लक्ष झाल्याचे वक्तव्य केले होते.
Thorat and vikhe.jpg
Thorat and vikhe.jpg

संगमनेर : भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे यांनी जिल्ह्यातल्या मंत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्याला महत्व देण्याची गरज वाटत नाही, त्यांना नियतीने दिलेली विरोधी पक्षाची भुमिका ते बजावताहेत, अशा शब्दात राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटलांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला.

आज सकाळी संगमनेरात झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. काल विखे यांनी जिल्ह्यातील पालकमंत्र्यांसह चार मंत्र्यांचे दुर्लक्ष झाल्याचे वक्तव्य केले होते. 

थोरात म्हणाले, की देशासह राज्यावर आलेल्या कोरोनाच्या भीषण संकटातही काही लोक राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे दुर्दैवी आहे. वास्तविक अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सर्वपक्षीय मतभेद विसरुन, सर्वांनी एकत्र येत लढा देण्याची आवश्यकता आहे.

सरकारच्या निर्णयाला नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. जगासह देश व राज्यात कोरोनाची दुसरी लाट धोकादायक ठरत आहे. याबाबत राज्य सरकार व स्वतः मुख्यमंत्री जातीने लक्ष घालून निर्णय घेत आहेत. कोरोनाचा संसर्ग थांबवणे नवीन संसर्ग होवू न देणे व मृत्यू रोखण्याचा अंतीम उद्देश आहे. यासाठी काही प्रमाणावर बंधने आणली आहेत. तरीही काळजी वाटते आहे. यावर विरोधी पक्षासह सरकारमधील महत्वाच्या नेत्यांशी मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत.

मृत्यूदर शून्य होण्याच्या उद्देशाने आवश्यक ते सर्व निर्णय़ घ्यावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. नगर जिल्ह्यात दोन दिवसात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूमुळे निर्माण झालेले चित्र भयानक आहे. मात्र हे केवळ नगरमध्येच आहे, असे नाही. सर्वत्र कोवीडनंतर झालेल्या संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. म्हणून कडक निर्णय घ्यावे लागणार आहेत. 

राज्यातील मिनी लॉकडाऊनला व्यापाऱ्यांचा विरोध, तर राज्यकर्त्यांचा आग्रह या पार्श्वभुमिवर बोलताना ते म्हणाले, की मागील वर्षात व्यापारी बांधवांचे मोठे नुकसान झाले, हातावर पोट असलेल्यांची परिस्थिती अतिशय अवघड झाली असली, तरी हे मानवतेवरील संकट आहे, हे विसरु नये. या संकटाला सामेरे जावे लागणार आहे. कोरोनाच्या रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा व काळाबाजार याबाबत बोलताना ते म्हणाले, की कोरोना बाधितांचा आकडा मोठा आहे, मात्र कोणाला इंजेक्शनची गरज आहे, कोणाला नाही, याबाबतचे काही संकेत पाळावे लागतील.

इंजेक्शनची साठेबाजी थांबली पाहीजे. याचे निर्णय होत आहेत. काही खंबीर व भक्कम निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी करावी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
 

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com