आर. आर. पाटील यांच्याप्रमाणेच आमदार लंके यांचेही काम

कार्यकर्त्यांना वाटते फक्त सत्ता म्हणाजेच राजकारण होय. तसे न करता राजकारणातून समाजसेवा करावी.
Nilesh lanke
Nilesh lanke

पारनेर : आर. आर. पाटील हे माझे आदर्श होते व आहेत. त्याचप्रमाणे आमदार नीलेश लंके व राजेंद्र फाळके यांचे सुद्धा तेच आदर्श आहेत. ते सुद्धा आर. आर. पाटील यांच्याप्रमाणे काम करत आहेत. राजकीय कार्यकर्त्यांनी राजकारण करत असताना फक्त खुर्ची किंवा पद मिळविण्यासाठी राजकारण न करता निवडून आल्यावर पदाचा वापर समाजसेवेसाठी , जनतेची कामे करण्यासाठी  करावा. सध्या आमदार निलेश लंके चांगले काम करत आहेत, असे गौरवोद्गार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काढले. (R.R. Like Patel, MLA Lanka's work: Praise from Hazare)

राळेगणसिद्धी येथे चार कोटी रुपये खर्चाच्या राळेगणसिद्धी ते पारनेर फाटा रस्त्याच्या खडीकरण मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, या कामाचा प्रारंभ हजारे यांच्या हस्ते झाला, त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके होते.

अशोक सावंत, बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे, संभाजी रोहकले, सुदाम पवार, राजेंद्र चौधरी, अॅड.राहुल झावरे, किसन रासकर, पुनम मुंगसे, बापू शिर्के, पोटघन मेजर, सचिन पठारे, जयसिंग मापारी, अभय नांगरे, अरुण पवार, संदिप मगर, दत्ता आवारी  परीसरातील  सरपंच, उपसरपंच ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.

हजारे म्हणाले, की कार्यकर्त्यांना वाटते फक्त सत्ता म्हणाजेच राजकारण होय. तसे न करता राजकारणातून समाजसेवा करावी. या पुर्वी कार्यकर्त्यांचा कार्यशाळा होत तेथे कार्यकत्यांना समाजसेवेचे धडे मिळत असत. पण आता तसे होत नाही, अशी खंतही या वेळी हजारे यांनी व्यक्त केली. मी जीवनात समाजसेवेचे व्रत घेतले आहे. तसेच आमदार लंके यांनी सुद्धा समासेवेचा वसा घेतला आहे. त्यांचे काम आदर्शव्रत आहे, असेही त्यांनी सांगितले.

या वेळी आमदार लंके म्हणाले, की मी आमदार असलो, तरी समाजाने मला आमदार केले आहे. मी त्यांचा सेवक आहे.  त्यांनी मला समाजाच्या सेवेसाठी निवडून दिले आहे. मला समाजातील कोणीही व्यक्ती दुःखी दिसू नये, अशी एकच मागणी मी परमेश्वराकडे सतत करत आहे.

Edited By - Amit Awari

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com