रक्षक बनला भक्षक ! सहकाऱ्याच्या आईला पाठविला अश्लिल मेसेज, पोलिसावर गुन्हा

एका पोलिस कर्मचाऱ्याच्या आईला काही दिवसांपासून अश्‍लिल मेसेज पाठविण्यात येत होते.
Crime.jpg
Crime.jpg

नगर : एकेकाळच्या सहकारी पोलिस कर्मचाऱ्याच्या आईला अश्‍लिल मेसेज पाठविल्याबद्दल तोफखाना पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक रामदास जयराम सोनवणे (वय 32) (Ramdas Sonavane) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मातृदिनाच्या दिवशी हा प्रकार घडला आहे. (The protector became the eater! Sent obscene message to colleague's mother, crime against police)

एका पोलिस कर्मचाऱ्याच्या आईला काही दिवसांपासून अश्‍लिल मेसेज पाठविण्यात येत होते. 

पोलिस कर्मचाऱ्याची आई अश्‍लिल मेसेजच्या या प्रकाराला वैतागून गेलेली होती. तिने ही हकीकत आपल्या मुलाला सांगितली. संबंधित महिलेने ही बाब वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिली. शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे यांनी तात्काळ या प्रकरणी तोफखाना पोलिसांशी संपर्क करून संबंधित प्रकार काय आहे, याची खात्री करून तात्काळ गुन्हा दाखल करा, अशा प्रकारचे निर्देश दिले होते. 

त्यानुसार तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील गायकवाड यांनी संबंधित महिलेला आलेले मेसेज तसेच फोन रेकॉर्डिंग या सर्व बाबींची पडताळणी केली. या पडताळणीत महिलेच्या तक्रारीत प्रथमदर्शनी तथ्य आढळून आले. पोलिस निरीक्षक गायकवाड यांनी याबाबत उपअधीक्षकांना अहवाल पाठविला. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

हेही वाचा..

संबंधित महिलेच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक रामदास सोनवणे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेचा पोलिस कर्मचारी मुलगा व सोनवणे हे पूर्वी एकाच पोलिस ठाण्यात कार्यरत होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र पिंगळे हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत. 

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील जाणकार 

पोलिस नाईक रामदास सोनवणे हे तोफखाना पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांचे वाचक या पदावर कार्यरत होते. पोलिस निरीक्षकांकडील महत्वांच्या गुन्ह्यांचे दोषारोपपत्र तयार करण्याची महत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे होते. कायद्याचे चांगले ज्ञान असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यास ही महत्वाची जबाबदारी सोपविली जाते.

सोनवणे यांना माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील जाणकार होते. पोलिस निरीक्षकांचे वाचक म्हणून कामाच्या व्यतिरिक्‍त चोरीला गेलेले मोबाईल, हरविलेले मोबाईल यांचा शोध घेण्यात त्यांचा हातखंड होता. सुमारे शेकडो मोबाईल मूळ मालकांना मिळवून दिले होते. 

दरम्यान, आज झालेल्या या प्रकाराची महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे.

Edited By - Murlidhar Karale


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com