आमदार लंके यांनी दिलेला शब्द खरा ठरतोय, पारनेरच्या पाणी योजनेचे सर्वेक्षण सुरू - The promise made by MLA Lanka is coming true, Parner's water scheme survey is underway | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.

आमदार लंके यांनी दिलेला शब्द खरा ठरतोय, पारनेरच्या पाणी योजनेचे सर्वेक्षण सुरू

मार्तंड बुचुडे
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

शहराचा अतिशय जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न सुटावा, या साठी काही नगरसेवक तसेच आमदार लंके हे सातत्याने पाठपुरावा करीत होते. त्यांच्या या पाठपुराव्यास यश आले आहे.

पारनेर : शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचा शब्द आमदार निलेश लंके यांनी शहरातील नागरीकांना दिला होता. मुळा धरणाच्या जलाशयातून ( बँक वॉटर ) जांभळी येथून ही योजना राबविण्यात यावी, असा प्रस्ताव लंके यांनी मंत्रालय स्तरावर सादर केला होता.

हा प्रस्ताव सादर करण्या पुर्वीच लंके यांनी मुख्यमंत्री उध्वव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजीत पवार यांची भेट घेऊन पारनेरचा पाणी प्रश्न सोडविण्याचे साकडे घातले होते, त्याच वेळी संबंधितांनी तुम्ही प्रस्ताव दाखल करा, आम्ही मंजूरी देतो, असा शब्द दिला होता. आज या योजणेच्या सर्वेचे काम सुरू झाल्याने शहरवाशियांनी आनंद व्यक्त केला आहे.

शहराचा अतिशय जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न सुटावा, या साठी काही नगरसेवक तसेच आमदार लंके हे सातत्याने पाठपुरावा करीत होते. त्यांच्या या पाठपुराव्यास यश आले आहे. काल जीवन प्राधिकरणाचे अधिकारी शहराच्या पाणी योजनेच्या सर्वेक्षणासाठी पारनेरमध्ये दाखल झाले. 

लंके यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना आमच्या तालुक्याचे गावच तहानलेले आहे. त्यासाठी आपण सहकार्य करावे, अशी गळ घातली होती. तुम्ही राष्ट्रवादी काँगेसचे आमदार असले, तरी महाविकास आघाडीचे आमदार आहेत, त्यामुळे पारनेरचा पाणी प्रश्न प्राधान्याने सोडविला जाईल, अशी ग्वाही दिली होती. 

ठाकरे तसेच पवार यांनी पारनेरच्या पाणीयोजनेस चालना दिल्याने गेल्या काही वर्षापासून प्रलंबित असलेला पारनेरकरांचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे. 

हा प्रश्न यापूर्वीच सुटायला हवा होता

शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मी शब्द दिला आहे, तो लवकरच पूर्ण करण्याचा मानस आहे. माता भगिनींना पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी वणवण करावी लागत आहे, याचे मोठे दुःख मला होत आहे. ज्यांनी अनेक वर्षे मतदार संघाचे नेतृत्व केले, त्यांनी खरे तर हा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे होते, असे मत आमदार नीलेश लंके यांनी व्यक्त केले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख