खासगी डॉक्‍टरांनी माणुसकी दाखवावी : खासदार सदाशिव लोखंडे - Private doctors should show humanity: MP Sadashiv Lokhande | Politics Marathi News - Sarkarnama

खासगी डॉक्‍टरांनी माणुसकी दाखवावी : खासदार सदाशिव लोखंडे

आनंद गायकवाड
बुधवार, 12 मे 2021

रॅपिड अँटिजेन चाचणी लसीकरणाच्या आदल्या दिवशी घेण्याचे नियोजन केल्यास नागरिकांचा वेळ वाचून गर्दी टळेल, अशीही सूचना त्यांनी केली.

संगमनेर : "ग्रामीण भागात कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. कोरोनाच्या संकटात खासगी डॉक्‍टरांकडून गोरगरीब रुग्णांची होणारी लूट थांबली पाहिजे. खासगी डॉक्‍टरांनी माणुसकी दाखवावी,'' असे म्हणून खासदार सदाशिव लोखंडे यांनी गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांना शासकीय दरपत्रकाप्रमाणे बिलांची आकारणी होते का, याचे ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या. (Private doctors should show humanity: MP Sadashiv Lokhande)

रॅपिड अँटिजेन चाचणी लसीकरणाच्या आदल्या दिवशी घेण्याचे नियोजन केल्यास नागरिकांचा वेळ वाचून गर्दी टळेल, अशीही सूचना त्यांनी केली. 

येथील नगरपरिषदेत झालेल्या कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी संगमनेरमध्ये योग भवनाच्या निर्मितीसाठी 80 लाखांचा निधी मंजूर झाल्याचे पत्र लोखंडे यांनी नगराध्यक्ष दुर्गा तांबे व डॉ. सुधीर तांबे यांना सुपूर्द केले. 

हेही वाचा...

फकिर योद्ध्याला सलाम

तालुक्‍यात लसीकरणाबाबत योग्य नियोजन नाही. लसींचा मोठा तुटवडा आहे. ज्येष्ठ नागरिकांना दिवसभर लसीकरण केंद्रावर थांबूनही लस मिळत नाही. लसीकरणापूर्वी रॅपिड अँटिजेन चाचणीच्या सक्तीचा निर्णय मनस्ताप देणारा आहे. या गर्दीमुळे प्रादुर्भावाची दाट शक्‍यता आहे. स्थानिक रुग्णांना रुग्णालयात बेड मिळत नाही; मात्र तालुक्‍याबाहेरील रुग्णांना मिळतात. लसीकरणाच्या नोंदणीचा उडालेला बोजवारा आदी तक्रारींचा पाढा स्थानिक पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी वाचला. 

आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, प्रशासनाधिकारी श्रीनिवास पगडाल, अमोल खताळ, अमर कतारी, सचिन कानकाटे, अशोक सातपुते, रमेश काळे आदी उपस्थित होते. 

लाॅकाऊन आपल्या हिताचे

शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, प्रशासनास सहकार्य करावे. "लॉकडाउन' आपल्या हितासाठी आहे. विनाकारण घराबाहेर पडू नये. अनेक जण रस्त्यावर फिरताना दिसतात. कोरोना साखळी तोडण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. 
- सदाशिव लोखंडे, खासदार 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख