प्रवरा कोविड सेंटर ठरला आधार ! विखे पाटील रोज तीन तास थांबून घेतात आढावा - Pravara Kovid Center became the basis! Vikhe Patil stops for three hours every day | Politics Marathi News - Sarkarnama

प्रवरा कोविड सेंटर ठरला आधार ! विखे पाटील रोज तीन तास थांबून घेतात आढावा

सुहास वैद्य
रविवार, 23 मे 2021

पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कोविड सेंटरला आमदार विखे पाटील दररोज काही तास वेळ देत आहेत.

कोल्हार : आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी लोणी येथे सुरू केलेले प्रवरा कोविड सेंटर जिल्ह्यातील रुग्णांसाठी आधार ठरत आहे. या केंद्रात आमदार राधाकृष्ण विखे पाटील दररोज सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत उपस्थित राहून कामकाजाचा आढावा घेऊन अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत. (Pravara Kovid Center became the basis! Vikhe Patil stops for three hours every day)

येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कोविड सेंटरला आमदार विखे पाटील दररोज काही तास वेळ देत आहेत. यावेळेत ते रुग्णांना दिलेले उपचार, आहार, योगासने तसेच अन्य बाबींच्या वेळा पाळल्या जातात की नाही, यावर लक्ष ठेवत आहेत. तसेच दिवसभराचा आढावा घेऊन पुढील नियोजनाबाबत संबंधितांना सूचना करत आहेत. ज्या वस्तूंची आवश्‍यकता आहे, त्या वस्तू तातडीने केंद्रास मिळतील, याची व्यवस्था करत आहेत. 

विखे पाटील दररोज सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत कोविड सेंटरमध्ये वेगवेगळ्या संस्थांची मदत घेऊन त्यांच्या समस्यांचे निवारण करीत असतात. विखे यांचे हमखास भेटण्याचे ठिकाण म्हणून आता लोणी येथे राहाता, संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव व राहुरी तालुक्‍यांतील अनेक कार्यकर्ते येथे येत आहेत. जनतेशी, कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतात. तसेच या समस्या जागेवर सोडविण्यासाठी प्राधान्य देत आहेत. त्यांच्या या कार्यशैलीमुळे जनतेचे अनेक प्रश्‍न तत्काळ मार्गी लागत आहेत. 

सर्वांचे सहकार्य मिळाले

जिल्ह्यात एकूणच कोरोनाची परिस्थिती अतिशय भयावह आहे. सामान्य रुग्णांना आधार मिळत नसल्याने कार्यकर्त्यांच्या सहकार्याने कोविड सेंटर सुरू केले. आतपर्यंत येथून 488 रुग्ण बरे होऊन गेले आहेत. या सेंटरसाठी खारीचा वाटा उचलण्याचे मोठे समाधान आहे. 
- आमदार राधाकृष्ण विखे पाटील

हेही वाचा..

पेन्शनधारकांचे एक दिवसीय उपोषण 
 

श्रीरामपूर : पेन्शनवाढीच्या प्रतीक्षेत अनेक पेन्शनधारकांचे कोरोनाच्या संकटात मृत्यू झाला आहे. त्यामुळे इपीएस 95 पेन्शनधारकांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवस देशव्यापी उपोषण आंदोलन पुकारले आहे, अशी माहिती राष्ट्रीय संघर्ष समितीचे राज्य कार्याध्यक्ष सुभाष पोखरकर यांनी दिली.

पोखरकर म्हणाले की, देशभरातील 67 लाख पेन्शनधारक एक जून रोजी आपल्या कुटुंबासोबत घरात उपवास करुन निषेध व्यक्त करणार आहेत. सोशल माध्यमाद्वारे खासदार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपवास आंदोलनाचे फोटो पाठवून न्यायासाठी विनंती केली जाणार आहे. 
देशातील विविध महामंडळे, खाजगी उद्योग संस्था, सहकार क्षेत्र आदीमध्ये इपीएस 95 पेन्शनधारक गेल्या अनेक वर्षापासून न्यायाच्या अपेक्षेत आहे. पेन्शनधारकांना दरमहा केवळ 300 ते तीन हजार रुपये पेन्शन मिळते. त्या व्यतिरीक्त कुठलाही महागाई भत्ता अथवा वैद्यकीय सुविधा मिळत नाही. कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत देशभरात पेन्शनवाढीसाठी अनेक आंदोलने झाली. आंदोलकांनी दिल्लीत पंतप्रधान, कामगार मंत्री यांच्या भेटी घेतल्या. 
खासदार, अभिनेत्या हेमा मालिनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून याबाबत चर्चा झाली होती. त्यावेळी पेन्शनवाढीची समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे पेन्शनधारकांमध्ये आशा निर्माण झाली होती. केंद्रीय कामगार मंत्री यांनी आश्वासन दिल्याने सर्व आंदोलने स्थगित केली. तसेच राज्यातील जिल्हाधिकारी यांना निवेदने दिली. परंतु पेन्शनवाढीबाबत अद्याप सरकारने दखल घेतली नसल्याचा आरोप पोखरकर यांनी केला आहे. 

हेही वाचा..

खतांच्या किमतीबाबत घेतलेल्या निर्णयाचे स्वागत ः विखे पाटील

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख