ऊर्जामंत्र्यांच्या आजोबांच्या नावे असलेल्या कारखान्याची वीज तोडली, थकबाकी सव्वा कोटी

डॉ. तनपुरे साखर कारखान्यावर खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील संचालक मंडळ कार्यरत आहे. त्यांची पाच वर्षांची मुदत संपली आहे,
prajakt tanpure 1.jpg
prajakt tanpure 1.jpg

राहुरी : ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या आजोबांच्या नावे असलेल्या साखर कारखान्याचा वीज पुरवठा थकबाकीमुळे खंडीत करण्यात आला आहे. तब्बल सुमारे सव्वा कोटी रुपयांची थकबाकी असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. (Power outage in factory named after energy minister's grandfather, arrears of Rs)

डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे एक कोटी १७ लाख रुपयांचे वीजबिल थकल्यामुळे महावितरण कंपनीने कारखान्याचा वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे कारखाना परिसर व कामगार वसाहतीत अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.

डॉ. तनपुरे साखर कारखान्यावर खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील संचालक मंडळ कार्यरत आहे. त्यांची पाच वर्षांची मुदत संपली आहे, परंतु राज्य सरकारने कोरोना आपत्तीत सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत. एक ऑगस्टनंतर संचालक मंडळाला पुन्हा मुदतवाढ मिळणार काय, कारखान्यावर प्रशासकीय मंडळाची नियुक्ती होणार, की निवडणूक प्रक्रिया सुरू होणार, याविषयी संदिग्धता आहे. त्यामुळे कारखाना व्यवस्थापनात शिथिलता आली आहे.

कारखाना आर्थिक अरिष्टात

आर्थिक चक्रव्यूहात अडकल्याने कारखान्याचा सन २०१३-१४, २०१४-१५ व २०१६-१७चा गळीत हंगाम बंद राहील. २०१४-१५मधील कारखाना निवडणुकीत खासदार डॉ. विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ अस्तित्वात आले. तत्कालीन आमदार शिवाजी कर्डिले यांच्या सहकार्यातून जिल्हा बँकेच्या कर्जाचे पुनर्गठन करून, सन २०१७-१८ पासून कारखाना पूर्ववत सुरू झाला. मात्र, कारखान्याचे असंतुलन पाचशे कोटींच्या वर गेले.

मागील गळीत हंगामात शेतकऱ्यांच्या उसाची एफआरपी विहित मुदतीत अदा झाली नाही. गाळप परवाना मिळण्यास उशीर झाला. त्यामुळे साखर आयुक्तांनी कारखान्याला आठ कोटी रुपयांच्या दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली. त्यावर कारखान्याने सहकारमंत्र्यांसमोर अपील केले आहे. त्याचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. दोन महिन्यांपासून कारखान्याच्या कामगारांना रजेवर पाठविण्यात आले आहे. त्यामुळे कारखान्यात शुकशुकाट आहे. या वर्षी कारखाना सुरू होईल की नाही, याविषयी ऊसउत्पादकांमध्ये संभ्रम आहे.

थकबाकीची नोटीस

तनपुरे साखर कारखान्याच्या वीजबिलाची एक कोटी १७ लाख ६९ हजार ३९२ रुपयांची थकबाकी आहे. २० जून २०२१ रोजी कारखान्याला थकबाकी भरण्यासाठी नोटीस बजावली. थकबाकी न भरल्याने २५ जुलै २०२१ रोजी कारखान्याचा वीजपुरवठा खंडित केला आहे.
- प्रकाश जमधाडे, कार्यकारी अभियंता, महावितरण, नगर

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com