साईसंस्थानचे संभाव्य विश्वस्त ! काॅंग्रेस व राष्ट्रवादीला प्रत्येकी सहा, तर शिवसेनेला चार जागा - Potential trustees of Sai Sansthan! Congress and NCP have six seats each, while Shiv Sena has four | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

साईसंस्थानचे संभाव्य विश्वस्त ! काॅंग्रेस व राष्ट्रवादीला प्रत्येकी सहा, तर शिवसेनेला चार जागा

मुरलीधर कराळे
बुधवार, 23 जून 2021

साईसंस्थानवर कोणाला संधी मिळणार, याबाबत गेल्या महिनाभरापासून चर्चा सुरू होती. महाविकास आघाडी सरकार याबाबत निर्णय घेणार असल्याने साहकजिकच राष्ट्रवादी, शिवसेना व काॅंग्रेसमध्ये जागा वाटप होणार होते.

नगर : देवस्थानाच्या अध्यक्षपदाबाबत महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये चर्चा होऊन पंढरपुरच्या विठ्ठल मंदिराच्या अध्यक्षपदी काॅंग्रेसला संधी मिळाली, तर शिर्डीतील (Shirdi) साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळाले. साईसंस्थानचे नवीन विश्वस्तमंडळात राष्ट्रवादी व काॅंग्रेसला प्रत्येकी सहा जागा देण्याचे नियोजन असून, शिवसेनेला चार जागा मिळणार आहेत. एका जागेवर अद्याप संभाव्य विश्वस्त निवडणे बाकी आहे. (New trustee of Sai Sansthan! Congress and NCP have six seats each, while Shiv Sena has four)

साईसंस्थानवर कोणाला संधी मिळणार, याबाबत गेल्या महिनाभरापासून चर्चा सुरू होती. महाविकास आघाडी सरकार याबाबत निर्णय घेणार असल्याने साहकजिकच राष्ट्रवादी, शिवसेना व काॅंग्रेसमध्ये जागा वाटप होणार होते.

वरिष्ठांच्या चर्चेनंतर राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांना अध्यक्षपद मिळणार आहे. इतर पाच जणांना विश्वस्तमंडळात सामावून घेण्यात येणार आहे. काॅंग्रेसच्याही सहा जणांना नव्या विश्वस्तमंडळात संधी मिळणार आहे. शिवसेनेच्या वतीने खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह इतर तिघांना संधी देण्यात येणार आहे.

भाजपला संधी नाही

गेल्या काही वर्षांपासून साईसंस्थानवर भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे वर्चस्व होते. त्या वेळी ते काॅंग्रेसमध्ये होते. सध्या राज्यात भाजप विरोधी बाकावर आहे. संस्थान राज्य सरकारच्या अखत्यारित असल्याने विश्वस्तपदाच्या निवडी महाविकास आघाडी करणार होते. त्यामुळे साहजिकच या वेळी विखे पाटील यांना यापासून दूर राहण्याची वेळी आली.

शिर्डीतील साईसंस्थानचे नवे संभाव्य विश्वस्तमंडळ असे ः

राष्ट्रवादी काॅंग्रेस ः आमदार आशुतोष काळे, जयंत जाधव, महेंद्र शेळके, सुरेश वाबळे, संदीप वर्पे, अनुराधा आदिक.

काॅंग्रेस ः डाॅ. एकनाथ गोंदकर, डी. पी. सावंत, सचिन गुजर, राजेंद्र भोतमागे, नामदेव गुंजाळ, संग्राम देशमुख.

शिवसेना ः खासदार सदाशिव लोखंडे, रावसाहेब खेवरे, रवींद्र मिर्लेकर, राहुल कनाल,

अद्याप एक नाव प्रलंबित आहे.

अर्थात ही यादी सध्या तयार करण्यात आली असली, तरी न्यायालयात याचिका दाखल झालेली आहे. त्यानंतरच या नावांवर शिक्कामोर्तब होणार आहे.

 

हेही वाचा..

काळे यांचे नाव पुढे येताच आतिषबाजी

 

हेही वाचा..

शिर्डी देवस्थान राष्ट्रवादीकडे, तर पंढरपुरचे काॅंग्रेसकडे

 

हेही वाचा..

जगातील लोक साईबाबांना साकडे घालतात अन इथले नेत्यांना

 

हेही वाचा..

साईसंस्थानवर स्थानिकांनाच प्राधान्य हवे

 

हेही वाचा..

साईसंस्थानवर प्रताप ढाकणे यांना संधी मिळावी

 

हेही वाचा..

महाविकास आघाडीसमोर नवे विश्वस्तमंडळ निवडण्याचे आव्हान

 

हेही वाचा..

साईबाबा संस्थानवर दोन्ही काॅंग्रेसचा दावा

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख