राम शिंदेंकडे रुग्णांच्या व्यथा ! रेमडेसिव्हिर, आॅक्सिजन उपलब्ध करून द्या - Patients' woes to Ram Shinde! Remedivir, make oxygen available | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

राम शिंदेंकडे रुग्णांच्या व्यथा ! रेमडेसिव्हिर, आॅक्सिजन उपलब्ध करून द्या

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 10 मे 2021

प्रा. शिंदे यांनी राशीन येथील कोरोना सेंटरला आज भेट दिली. तेथे दाखल असलेल्या कोरोनाबाधित रूग्णांशी प्रा. शिंदे यांनी सवांद साधत त्यांची विचारपूस केली.

राशीन : राशीन येथील कोविड सेंटरला भेट देण्यासाठी आलेल्या माजी मंत्री प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांच्याकडे रुग्णांनी व नातेवाईकांनी व्यथा मांडली. आम्हाला रेमडेसिव्हिर, आॅक्जिन उपलब्ध करून द्यावा. त्यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करावा, अशी मागणी केली. (Patients' woes to Ram Shinde! Remedivir, make oxygen available)

प्रा. शिंदे यांनी राशीन येथील कोरोना सेंटरला आज भेट दिली. तेथे दाखल असलेल्या कोरोनाबाधित रूग्णांशी प्रा. शिंदे यांनी सवांद साधत त्यांची विचारपूस केली.

डॉ. विनायक जगताप, डॉ. अनुप दोभाडा, डॉ. नितीन खरात, डॉ. गणेश रेणुके, डॉ. सुनील दोभाडा, डॉ. निखिल नेटके, डॉ. युवराज शिंदे यांच्या टीमने प्रा. शिंदे यांच्याकडे या रूग्णांसाठी रेमडेसिव्हिर व आॅक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करावा, अशी मागणी केली.

हेही वाचा..

रक्षण बनला भक्षक

या दोन्ही गोष्टींच्या अभावामुळे रूग्णांवर उपचार करताना डॉक्‍टरांना मोठी कसरत करावी लागत असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. तसेच या रूग्णालयातून उपचार घेऊन बरे होऊन गेलेल्या रूग्णसंख्येची माहिती प्रा. शिंदे यांना देण्यात आली.

या वेळी प्रा. शिंदे यांच्या समवेत भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, प्रसाद ढोकरीकर, जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक अंबादास पिसाळ, अशोक खेडकर, सचिन पोटरे, बंडा मोढळे, पांडूरंग भंडारे, दत्ता गोसावी, तात्यासाहेब माने, शोयब काझी, संकेत पाटील, संजय ढगे आदी उपस्थित होते.

माणुसकी जपा

कोरोनाचे रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना शक्‍य असेल ती मदत करा, त्यांना धीर द्या, गरज वाटेल तिथे मला हाक द्या, माणसं आणि माणुसकी सध्याच्या अडचणीच्या परिस्थितीमध्ये प्रयत्नांची पराकाष्टा करून जिवंत ठेवा, अशा सूचना प्रा. शिंदे यांनी उपस्थितांना दिल्या.

 

हेही वाचा..

नियम मोडून गर्दीचा उच्चांक 

शेवगाव : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तालुका प्रशासनाने मंगळवार (ता. 11) पासून सात दिवस जनता कर्फ्यू लागू केल्याने आज सोमवारी नागरीकांनी खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी केली.

पुढील सात दिवसासाठी मेडीकल वगळता सर्व दुकाने बंद राहणार असल्याने नागरीक किराणा, भाजीपाला, अत्यावश्‍यक साहित्य तसेच पशुखाद्य, खते, बियाणे, औषधांच्या खरेदीसाठी घराबाहेर पडले. 

तालुक्‍यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. काल त्यात 327 बाधीत संख्येचा उच्चांक झाला. त्यामुळे तालुका प्रशासनाने मंगळवार (ता.11) पासून पुढील सात दिवस जनता कर्फ्यूचे नियोजन केले.

यामध्ये तालुक्‍यातील दवाखाने व औषध दुकाने वगळता किराणा, भाजीपाला, कृषी सेवा केंद्र इतर अत्यावश्‍यक सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे पुढील सात दिवसासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरीकांनी शहरातील दुकानात धाव घेतली. त्यामुळे एकाच वेळेस बाहेर पडलेल्या नागरीकांनी बाजार पेठेतील सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले. वाहनांच्या व नागरीकांच्या गर्दीत ट्रॉफीक जामचा ही अनुभव आला. गरर्दीमुळे प्रशासनाने घालून दिलेले कोरोना नियमांना पायदळी तुडवल्याचे जाणवले. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख