म्युकरमायकोसिने ठोठावला नगरचा दरवाजा, जामखेडमध्ये आढळला रुग्ण - The patient was found in Jamkhed, knocking on the town gate by Mukarmyakosi | Politics Marathi News - Sarkarnama

म्युकरमायकोसिने ठोठावला नगरचा दरवाजा, जामखेडमध्ये आढळला रुग्ण

वसंत सानप
बुधवार, 12 मे 2021

जामखेड तालुक्‍यातील पिंपरखेड येथील रामभाऊ ढवळे या तरुणाला म्युकरमायकोसिसची लागण झाली आहे. त्याच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जामखेड : तालुक्‍यातील पिंपरखेड येथील रामभाऊ ढवळे (Rambhau Dhawale) या तरुणाला म्युकरमायकोसिसची लागण झाली आहे. त्याच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (The patient was found in Jamkhed, knocking on the town gate by Mukarmyakosi)

म्युकरमायकोसिसचा नगर जिल्ह्यातील पहिला रुग्ण जामखेड तालुक्‍यातील पिंपरखेडचा. रामभाऊ महादेव ढवळे (वय 48) कोरोनाशी झुंज देऊन बाहेर पडतो न पडतो, तोच त्याला म्युकरमायकोसिसने गाठले. त्याचे दोन्ही डोळे सुजले आहेत. एका डोळ्याची नजर कमी झाली आहे. त्याच्या उपचारार्थ त्याची पत्नी औषधाची शोधाशोध करते आहे. तिचा एकाच वेळी आजाराबरोबरच परिस्थितीशी संघर्ष सुरू आहे. 

यासंदर्भात रामभाऊच्या नववीत शिकणाऱ्या मुलीने तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना भेटून व्यथा सांगितली. रामभाऊ हे घरातील कर्ते पुरुष असून, त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यांना उपचारासाठी मदतीची गरज आहे. समाजातील दातृत्वसंपन्न व्यक्तींनी आर्थिक मदतीसाठी जामखेड तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी केले आहे. 

 

हेही वाचा...

कोरोनाबाधित 36 रुग्णांचा मृत्यू 

नगर : कोरोनाबाधित 36 रुग्णांचा बुधवारी (ता. 12) मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या यामुळे 2401 झाली आहे. दिवसभरात नवे 2711 रुग्ण सापडले असून, बाधितांची संख्या दोन लाख 19 हजार 269 झाली आहे. रुग्णालयात उपचार सुरू असलेल्यांची संख्या 25 हजार 322 झाली आहे. 

हेही वाचा...

श्रीगोंद्यात दडवले मृत्यू

जिल्ह्यात नवे 2711 रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालय प्रयोगशाळेत 136, खासगी प्रयोगशाळेत 1668, रॅपिड अँटिजेन चाचणीत 907 रुग्ण आढळले. सर्वाधिक रुग्ण अकोले तालुक्‍यात 275 आढळून आले आहेत. नगर तालुक्‍यातील 268 रुग्ण असून तो दुसऱ्या क्रमांकावर, तर संगमनेरमध्ये 256 रुग्ण आढळले असून तो तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. शहरातील रुग्णसंख्येमध्ये अल्पशी घट झाली आहे.

शहरात 250 रुग्ण आढळून आले. दिवसभरात कोरोनावर मात केलेल्या 4439 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत एक लाख 91 हजार 546 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण 87.35 टक्के झाले आहे. जिल्ह्यात विविध रुग्णालयांत उपचार सुरू असलेल्यांची संख्या 25 हजार 322 झाली आहे. 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख