मंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतले पारगाव दत्तक

नगर तालुक्यातील पारगाव भातोडी या ऐतिहासिक गावास सत्तार यांनी भेट दिली. व्याख्याते शिंदे यांनी गावासाठी ग्रामपंचायत कार्यालयाची मागणी केली होती.
Abdul sattar 1.jpg
Abdul sattar 1.jpg

नगर : गावकऱ्यांनी एकत्र येऊन गावाचा विकास करायचे ठरवले, तर काहीही अशक्य नाही. मात्र, अनेक ठिकाणी गावातील अंतर्गत वादामुळे विकासाभिमुख प्रकल्प बाजूला पडतात. व्याख्याते गणेश शिंदे यांच्या प्रेमामुळे पारगावला आलो. गावाचे ऐतिहासिक वैभव जतन करण्यासाठी मी गाव दत्तक घेत असल्याचे, महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. (Pargaon adopted by Minister of State for Revenue Abdul Sattar)

नगर तालुक्यातील पारगाव भातोडी या ऐतिहासिक गावास सत्तार यांनी भेट दिली. व्याख्याते शिंदे यांनी गावासाठी ग्रामपंचायत कार्यालयाची मागणी केली होती. ती मान्य करत सत्तार यांनी ग्रामपंचायत कार्यालयासह ७० लाख रुपयांच्या, गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन केले.

या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, बांधकाम विभागाचे सभापती काशिनाथ दाते, शहरप्रमुख दिलीप सातपुते, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, पंचायत समितीच्या सभापती सुरेखा गुंड, सरपंच मीनाक्षी शिंदे, उपसरपंच ताराबाई भोसले आदी उपस्थित होते.

सत्तार म्हणाले, की पारगाव भातोडीची ऐतिहासिक कथा मी अनेकदा ऐकली आहे. याच परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचे चुलते शरीफजी राजे यांना वीरमरण आले. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व असूनही हा परिसर विकासात्मक व पर्यटनदृष्ट्या दुर्लक्षित राहिला. मात्र, आता या गावाचा कायापालट करण्यासाठी हे गाव दत्तक घेत आहे, अशी घोषणा केली.

प्रास्ताविकात गणेश शिंदे यांनी खुमासदार शैलीत ग्रामीण भागातील समस्या उपस्थितांसमोर मांडल्या. याप्रसंगी ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या महागायिका ठरलेल्या पारगाव येथील सन्मिता शिंदे यांचा सत्तार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सागर शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा..

राहुरीतील आठ जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव

राहुरी : राहुरी पोलिस ठाण्यात दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या सराईत आठ गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव पोलिस अधीक्षक यांच्यामार्फत श्रीरामपूर येथील उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी दिली.

दुधाळ म्हणाले, ‘‘तालुक्यातील अवैध गावठी दारू विकणाऱ्या सराईत आठ गुन्हेगारांचे हद्दपारीचे प्रस्ताव तयार केले आहेत. सामान्य जनतेत सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी. गुन्हेगारांनी गुन्ह्यांपासून परावृत्त व्हावे, गुन्हेगारी नियंत्रणात यावी, या उद्देशाने आठ जणांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव तयार केले आहेत.’’

हेही वाचा..

गणेश बाळासाहेब शेंडगे (वय २२, रा. चिंचोली फाटा), अभिषेक गोरख मोरे (वय २०, तनपुरेवाडी रस्ता, राहुरी), विशाल सुनील जगधने (वय २०, तनपुरेवाडी, राहुरी), सुधाकर शिवाजी वर्पे (वय ३५, रा. पिंपळगाव फुणगी), रवींद्र ऊर्फ भोंद्या सूर्यभान माळी (वय २२, रा. बारागाव नांदूर), नितीन ऊर्फ भोल्या ऊर्फ गोट्या नानासाहेब विधाटे (वय २०, रा. ताहाराबाद), किरण ऊर्फ विकी बबन थोरात (वय २५, रा. चिंचोली फाटा), दत्तात्रेय भाऊसाहेब शिरसाठ (वय ४०, रा. कोल्हार) यांच्या हद्दपारीचे प्रस्ताव तयार केले असल्याचे दुधाळ यांनी सांगितले.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com