पंकजा मुंडे नाराज नाहीत : चंद्रकांत पाटील

निसर्ग, तौक्ते वादळ व अतिवृष्टीची मदत आपत्तिग्रस्तांना मिळालेली नाही. मदत दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दादागिरी करून सांगत आहेत.
पंकजा मुंडे नाराज नाहीत : चंद्रकांत पाटील
Chandrakant Patil.jpg

नगर : ‘‘पंकजा मुंडे या पक्षामध्ये कोणावरही नाराज नाहीत. खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न दिल्याने त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले होते. पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली आहे, असे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी माजी मंत्री पंकजा मुंडे या देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याचे वक्तव्य केले होते. याबाबत पाटील म्हणाले, की मुंडे यांचे कार्यकर्ते नाराज होते, तथापि, त्यांची समजूत घातलेली आहे.

पाटील यांनी माजी केंद्रीय मंत्री स्व. दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली.

पाटील म्हणाले, की निसर्ग, तौक्ते वादळ व अतिवृष्टीची मदत आपत्तिग्रस्तांना मिळालेली नाही. मदत दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दादागिरी करून सांगत आहेत. राज्यात अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री ठाकरे घराबाहेर पडत नाहीत. आपत्तिग्रस्तांना राज्य सरकारचा मदतीचा हात मिळालेला नाही, असा घणाघाती आरोप पाटील यांनी केला.

कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चिपळून परिसरात महापूर आला आहे. अनेक गावांना पाण्याने वेढा घातला आहे. तेथील अवस्था भीषण आहे. हातात हात घालून मदत केली पाहिजे. मात्र, मदत करायला कोणीच पुढे आलेले दिसत नाहीत. पूरपरिस्थितीवरून राजकीय आखाडा आम्ही करत नाही. आधी पूरग्रस्तांना बाहेर काढा. महापुरात कुणी राजकारण करायला बसले नाही. संबंधित जिल्ह्यांतील पालकमंत्र्यांना आदेश द्या. प्रशासनाला आदेश द्या. तेथे एकही मंत्री जायला तयार नाही.
दोन वर्षांपूर्वी सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये पूर आला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व मी महसूलमंत्री होतो. त्यावेळी आम्ही जिवापाड परिश्रम केले तरी काँग्रेसने टीका केली. त्यावेळी आम्ही चार लाख ७३ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले. जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था केली. आता मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत. कोल्हापूरची अवस्थाही बिकट आहे. तेथे दोन मंत्री आहेत. तेथील कोरोनाची स्थिती नियंत्रणात नाही, असा घणाघात पाटील यांनी केला.


 हेही वाचा..

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in